Fadnavis and CM Shinde : '2024 ला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार'; भाजप आमदाराच्या दाव्याने शिंदेंचं टेन्शन वाढलं ?

BJP and Shivsena : 2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा भाजप आमदाराने केला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या एक वर्षापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर अजित पवारही काही आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. पण अजितदादांनी सरकारमध्ये एन्ट्री केल्यानंतर रोजच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

यातच शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नार्वेकरांच्या हालचालींना जोरदार वेग आला. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. पण अशातच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मोठे विधान केले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
CM Shinde and Fadnavis meet Amit Shah : शाह-शिंदे-फडणवीसांची ४५ मिनिटं चर्चा; राजकीय उलथापालथ होणार ?

"2024 मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील", असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले. याच वेळी त्यांनी "2024 नाही तर 2034 पर्यंत देशात नरेंद्र मोदी यांचेच सरकार राहणार आहे", असा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

लाड यांच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही लगेचच आपली प्रतिक्रिया दिली. "प्रसाद लाड यांनी त्यांच्या नेत्याचे नाव घेणे यात काही गैर नाही. तसं आम्हालादेखील एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असे वाटते, तर अजित पवारांच्या गटालाही अजितदादा मुख्यमंत्री होतील असे वाटते", असे शिरसाट म्हणाले.

"आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते. सध्या एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यामुळे पुढच्या वेळेसदेखील तेच मुख्यमंत्री राहावेत, अशी आमची इच्छा आहे ", असे मत शिरसाटांनी व्यक्त केले.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली असली तरी सध्या प्रसाद लाड यांच्या विधानामुळे एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Amit Shah Mumbai Tour : अमित शाह मुंबईत असूनही अजित पवार बारामतीला का निघून गेले ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com