Bhanudas Mali sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Congress News : हा तर भाजपचा कुटिल डाव; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणास विरोध : भानुदास माळी

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad Congress News : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. राज्य सरकार मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करून त्यांचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचा त्यासाठी कडाडून विरोध आहे. भाजपचा आणि आरएसएसचा कुटिल डाव आहे, तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. परंतु ओबीसींच्या Congress OBC Cell आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची मागणी आहे, असे सांगुन भानुदास माळी म्हणाले, ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती पाहता ओबीसींचे सर्वच क्षेत्रातील आरक्षण आधीच धोक्यात आलेले आहे.

त्यातच मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करून ओबीसींचे आरक्षण पूर्णपणे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण काही जिल्ह्यांमध्ये दोन, पाच आणि आठ टक्के आहे. त्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत. भाजपने खाजगीकरणाच्या नावाखाली सर्व सरकारी कंपन्या आपल्या मित्रांच्या घशात घालून सरकारी नोकरी मधील आरक्षण संपुष्टात आणले आहे.

आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण दिले तरच ते न्यायालयीन प्रक्रियेत टिकेल.अन्यथा मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य नाही. मराठा समाजाला विनंती करतो की आंदोलने, जाळपोळ, उपोषण करून आपणास आरक्षण मिळवता येणार नाही. केंद्र सरकारने घटनात्मक आरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलली पाहिजेत. तरच मराठा तसेच ओबीसी समाजाला योग्य ते आरक्षण मिळेल.

गेली कित्येक वर्षे ओबीसी समाज जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे परंतु केंद्र सरकार अशा प्रकारची जनगणना करण्यास व इम्पेरिकल डेटा देण्यास सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही. जर जातनिहाय जनगणना झाली तर सर्वच समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात योग्य ती भूमिका घेता येईल.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन नवा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा भाजपचा आणि आरएसएसचा कुटिल डाव आहे तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT