Satara Maratha Protest : मराठा आंदोलकांवरील खटले विनामोबदला लढणार; सातारा बार असोसिएशनचा निर्णय

Jalana Maratha Protest जालना येथील घटनेचा सातारा वकील संघटनेच्या तातडीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.
Satara Bar Association
Satara Bar Associationsarkarnama
Published on
Updated on

Satara Maratha Protest : जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांवर झालेला अमानुष लाठीहल्ला, मराठा आरक्षण या विषयावर राज्यभर चाललेल्या मराठा आंदोलनाला जिल्हा बार असोसिएशनने पाठींबा दिला आहे. तसेच यावेळी झालेल्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील खटले विनामोबदला चालवण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे.

जालना येथील घटनेचा सातारा वकील संघटनेच्या Satara Advocate Association तातडीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, जे मराठा आंदोलनकर्ते Maratha Andolan आहेत त्यांच्या खटल्यात विनामोबदला वकीलपत्र दाखल करणार असल्याचे निवेदन बार असोसिएशनने निवासी उपजिल्हाधिकारी, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना देण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष अॅड. विजय देशमुख, उपाध्यक्ष अॅड . जितेंद्र पिसाळ, पदसिध्द उपाध्यक्ष अॅड . महेश नारायण कुलकर्णी जिल्हा सरकारी वकील, सचिव अॅड. सुरेश महादेव रूपनवर, सह. सचिव अॅड . रोहिणी शंतनू राक्षे, खजिनदार अॅड . गणेश जगन्नाथ राऊत, माजी अध्यक्ष अॅड. अंकुश जाधव, बार आसोसिएशनचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सातारा बार असोसिएशनने घेतलेल्या निर्णय राज्यभरातील वकिलांनी घ्यावा. आरक्षणाच्या लढ्यात कायदेशीर बाजू मांडून आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भावना समन्वयकांनी व्यक्त केली.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com