Sadabhau Khot, Shambhuraj Desai
Sadabhau Khot, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : ही तर सत्तेच्या भांगेची नशा.. सदाभाऊ, शंभूराज देसाई भिडले....

Umesh Bambare-Patil

Satara News : सत्तेची भांग पिल्यावर अंगात आल्यासारखा माणुस डुलायला आणि नाचायला लागतो, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली. तर, सदाभाऊ खोत हेच भांग पीत असतील यामुळेच त्यांनी नशेत असं वक्तव्य केलं असेल, असे प्रतिउत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी श्री. खोत यांना दिले.

पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्यावर रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनाच्या सांगता सभेत सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी जोरदार टीका केली होती. सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हेच माहित नाही. तो भाग्यवान माणुस कोण आहे, हे सुद्धा माहित नाही.

शेतक-यांचा मोर्चा निघाला मात्र पालकमंत्री यांनी साधा एक‌ फोन केला नाही ना आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर मिळाला नाही, ना एक ॲब्युलन्स सुद्धा दिली नाही, याची नाराजी माझ्या मनात असल्याची भावना मंत्री अतुल सावे यांच्यासमोर सदाभाऊ खोत यांनी बोलुन दाखवली.

तसेच सत्तेची भांग पिल्यावर अंगात आल्यासारखी माणसं डुलायला आणि नाचायला लागतो मात्र नशा उतरल्यावर सगळं गेलेलं असेल अशी जहरी टीका सुद्धा शंभूराज देसाई यांच नाव न घेता सदाभाऊ खोत यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT