Satara NCP News : राष्ट्रवादी अंतर्गत मतभेद; औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

Bandu Dhamal राष्ट्रवादीने पक्ष संघटनेत भाकरी फिरुन चैतन्य निर्माण करावे, असे मत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बंडु ढमाळ यांनी व्यक्त केले आहे.
NCP Leader Bandu Dhamal
NCP Leader Bandu Dhamalsarkarnama
Published on
Updated on

-अश्पाक पटेल

Satara NCP News : स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी मधील मतभेदामुळे जिल्हा औद्योगिक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय ऊर्फ बंडु ढमाळ यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला . यामुळे तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या गोटात विविध राजकीय तर्कविर्तकांना आज दिवसभर उधाण आले .

दत्तात्रय ऊर्फ बंडु ढमाळ यांनी आपल्या राजीनामा राष्ट्रवादी NCP उदयोग व व्यापार विभागाच्या प्रदेशाध्यक्षाकडे सोपवला असुन आपण दिलेल्या पदाचा जबाबदारीने निर्वहण केले . मात्र, गेल्या काही दिवसांपासुन स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेच्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा Resign देत असल्याचे त्यांनी पत्रकांत म्हटले आहे.

यामुळे राष्ट्रवादी मधील स्थानिक पातळीवरील दुफळी उफाळुन आली आहे. तसेच राष्ट्रवादी अंतर्गत मतभेद असल्याचे या राजीनाम्यामुळे पुढे आले आहे. राष्ट्रवादीला सध्या आत्मचितंनाची गरज आहे. गत काही काळापासुन खंडाळा तालुक्यातील केवळ चार - पाच प्रस्थापित लोकांच्या बैठकीतून पक्ष सुरु आहे

NCP Leader Bandu Dhamal
Loksabha election - BRS ठरणार कोणावर भारी? |BJP|NCP|Shivsena | Congress | Election 2024 | Sarkarnama

पक्षामध्ये नवीन चेहर्‍यांना संधी देणे आवश्यक आहे . तरुण तुर्क यांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मिळायला हवी. तरी राष्ट्रवादीने पक्ष संघटनेत भाकरी फिरुन चैतन्य निर्माण करावे, असे मत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बंडु ढमाळ यांनी स्पष्ट केले .

NCP Leader Bandu Dhamal
Satara News : नवउद्योजकांना ५५० कोटींचे अनुदान; युवकांनी रोजगार देणारे बनावे : उदय सामंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com