रहिमतपूर : रहिमतपूरचे वातावरण मला माहित आहे, येथे 'आरे ला कारे' करण्याची व अंगावर आला तर शिंगावर घेण्याची तयारी असणारी ही शिवसेना आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. वासुदेव माने यांच्या नेतृत्वाखाली रहिमतपूर नगरपालिकेवर भगवा फडकवावा. रहिमतपूरच्या विकासासाठी वासुदेव माने जो शब्द देतील, तो पूर्ण करण्यासाठी मंत्री म्हणून मी जबाबदार असेन, असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
रहिमतपूर येथे जाहीर नागरी सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख स्वराज्य कणसे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अरुण माने, सुखदेव आप्पा माने, शिवसेना शहराध्यक्ष सागर माने उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, या शहराला राज्यस्तरीय संपर्कप्रमुख पद असताना देखील कधीही शिवसेनेचा मेळावा झाला नाही. ते कोणतेही पद नसताना वासुदेव माने काकांनी घेतला. हे खरंच कौतुकास्पद आहे. रहिमतपूर नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी वासुदेव माने काका यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
पुढील पंधरा दिवसांत सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे ९० टक्के पदाधिकारी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत येतील. त्याबरोबर जे १५ आमदार बाकी आहेत ते पुढील एक महिन्यात शिंदे साहेबांसोबत असतील. त्या आमदारांसोबत माझी चर्चा झाली असल्याची त्यांनी सांगितले.
रहिमतपूर पालिका निवडणुकीसाठी वासुदेव माने यांनी तयारीला लागावे. रहिमतपूरचे वातावरण मला माहित आहे, येथे आरे ला कारे करण्याची व अंगावर आला तर शिंगावर घेण्याची तयारी असणारी ही शिवसेना आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. वासुदेव माने यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद उभी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविकात वासुदेव माने म्हणाले, १८५३ ची आशिया खंडातील सर्वात जुनी नगरपालिका असून राजकीय हेतूने रहिमतपूर पालिकेकडे दुर्लक्ष झाले आहे. रहिमतपूर नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद द्यावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.