Ganesh Sugar Factory Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory : 'गणेश'च्या निवडणुकीत थोरात-कोल्हे, विखे, स्वाभिमानी मैदानात

Election News : कारखान्याच्या 19 संचालक निवडीसाठी चुरस

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील गणेश कारखान्या निवडणुकीनिमित्त उत्तर नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या उत्तरेतील विखे, थोरात आणि कोल्हे आदी एकमेकांसमोर ठाकले आहेत. राजकीय शत्रुत्व कायम ठेवत ही मंडळी गणेश कारखान्याचे फायदा-तोटा, करार-मदार आदी मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर नगर जिल्ह्यातील (Ahmednagar) राजकारण तापले आहे. त्यातच सोमवारी (ता. 6) उमेदवारी मागे घेण्याचा दिवस होता. यावेळी काहींना अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे. यात मुख्य लढत होणारे थोरात-कोल्हे गटाचे 19, विखे गटाचे 19 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 9 या उमेदवारांमध्ये मुख्य लढत होणार आहे.

कारखान्याच्या १९ जागांसाठी ही निवडणूक १७ जून रोजी होत आहे. दरम्यान, यासाठी एकूण १०६ नामनर्देशन पत्र आले होते. त्यातील १३ अवैध ठरले तर २३ मे ते ६ जून या दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Marathi Latest News)

दरम्यान, डॉ. विठ्ठलराव विखे (प्रवरा) सहकारी कारखान्याकडे गणेश कारखाना पुन्हा चालवण्यासाठी देण्याबाबत करार केला होता. तो करार गणेशच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळाकडून धक्कादायक पद्धतीने करण्यात आला होता. यावरून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राधाकृष्ण विखे पाटीलांवर टीका केली होती. त्यामुळे गणेशच्या सभासदांत खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आता शेतकरी संघटनेने या विरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

गणेश कारखान्याचा करार एकतर्फी केला गेला. आठ वर्षांसाठी ३३.३३ कोटींचा करार पाळला गेला नाही. परिणामी कारखान्याचा तोटा ११० कोटींवर नेऊन ठेवला आहे. इतर देणींसह कारखान्याना आता २०० कोटी रुपयांचे देणे आहे.

याबाबत स्वाभिमानीचे अॅड. अजित काळे (Ajit Kale) म्हणाले, "राज्यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त कारखाने गैरव्यवहाराने ग्रस्त आहे. याला सभासद जबाबदार आहे. ते अशा गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी जागृत राहिले पाहिजे. ९०० कोटींनी प्रवरा तोट्यात असताना ते २३०० रुपये टनाला भाव देतो. तर गणेशाचा तोटा किमान पातळीवर आहे. त्यांच्यापेक्षा जास्त दर ऊस उत्पादकाला देता येईल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT