Ramesh Kadam Bail : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांना आठ वर्षानंतर जामीन

Mohol Former MLA : अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार
Ramesh Kadam
Ramesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Ramesh Kadam Got Bail : बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी हा जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने मंगळवारी (ता. ६ जून) जामीन मंजूर केल्याने कदम यांना आठ वर्षानंतर दिलासा मिळाला आहे. (Solapur News)

या प्रकरणी अधिक माहितीनुसार, रमेश कदम यांची आज्जी बायम्मा गणपत क्षीरसागर (रा. नांदनी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या नावे बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यात आले. दुग्धव्यवसायासाठी कर्ज मंजुरीचे आदेश काढून ते वितरण करण्यासाठी कदम यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला. त्यातून शासनाची व महामंडळाची 6 लाख 36 हजार 658 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अनिल राघोबा म्हस्के यांनी 31 मे 2017 रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Marathi Latest News)

Ramesh Kadam
Shivsena-BJP: दिव्याचे बॅनर डोंबिवलीत झळकले; शिंदे-भाजपाचे इथेही सूत जुळेना !

मस्के यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रमेश कदम (Ramesh Kadam) यांना अटक केले. त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी माजी आमदार रमेश कदम यांनी अॅड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अॅड. थोबडे यांनी काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

Ramesh Kadam
Ramdas Athawale News: रामदास आठवलेंना हव्या लोकसभेच्या दोन-तीन जागा, १०-१५ विधानसभाही मागणार !

थोबडे यांनी युक्तिवादात फिर्याद ही उशिराने दाखल झालेली आहे. कर्ज मंजुरीची रक्कम ही लाभार्थी बायम्मा क्षीरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तपास पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. त्यानंतर न्यायाधीशांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यावेळी अर्जदारतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे अॅड.अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com