Raj Thackeray, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ती वक्तव्ये विनोदी... अशा वक्तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत...शरद पवार

भाजपाला BJP सत्ता आपल्या हातात ठेवण्याची अस्वस्थता आहे. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळी महाविकास आघाडीवर Mahavikas aghadi टीका करतात.

Umesh Bambare-Patil

सातारा : 'ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्य केले. मी त्या विनोदाचा आस्वाद घेतो. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात, लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत,' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळून निशाणा साधला.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर श्री. पवार यांच्याशी माध्यम प्रतिनिधीनी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे व भाजपवर टीकेची झोड उठवली.

शरद पवार म्हणाले, विनोदी वक्तव्य केले की मी त्या विनोदाचा आस्वाद घेतला. अशाप्रकारची वक्तव्य केल्यास लोक हसतात, लोक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत. ओबीसी आरक्षणाविनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ओबीसी आरक्षण मार्ग कसा काढायचा यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळ प्रयत्न करत आहेत.

भाजपाला सत्ता आपल्या हातात ठेवण्याची अस्वस्थता आहे. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळी महाविकास आघाडीवर टीका करतात. भोंगा हा काय मुद्दा असू शकत नाही, त्यामुळे ज्यांच्याकडे काही नाही ते असं काही तरी बोलत असतात, असेही पवारांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT