तर आमदार मकरंद पाटलांच्या डोक्यावरील केसही राहणार नाहीत... अजित पवार

सातारा satara जिल्ह्यात बाळासाहेब पाटील Balasaheb Patil, मकरंद पाटीलMakrand Patil, सभापती रामराजेRamraje Naik Nimbalkar, शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje, शशिकांत Shashikant shinde आहेत ते जिल्हा बँक Satara DCC Bank चांगल्या पध्दतीने चालवत आहेत.
Ajit Pawar, Makrand Patil
Ajit Pawar, Makrand Patilsarkarnama
Published on
Updated on

सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणकीत परिवर्तन घडवत आमदार मकरंद पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे किसन वीरसह प्रतापगड, खंडाळा हे तीन कारखाने मकरंद पाटील यांच्या ताब्यात आले आहेत. आता, जर हा कारखाना नीट चालला नाही तर, आमदारकीला काही खरं नाही. आबाच, राहिलेलं केससुध्दा माझ्यासारखे निघुन जातील, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मकरंद पाटील यांच्यावर केली.

वाढे (ता. सातारा) येथील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, साखर कारखाना चालवणे तसे येड्या गबाळ्याचे काम नव्हेच. आता किसन वीरसह खंडाळा, प्रतापगड हे तीन कारखाने चालवणे मकरंद पाटील यांच्यापुढे आव्हान आहेच. पण करु, आम्हांला अनुभव आहे. आम्ही बंद पडलेले कारखाने घेवूनच हे आव्हान पेलले आहे.

Ajit Pawar, Makrand Patil
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या वीज बिल थकबाकीवर राधाकृष्ण विखे, म्हणाले...

सोमेश्वर कारखान्याची अवस्था दयनीय होती. पण आज जोमात सुरु आहे. माळेगाव साखर कारखाना ही आज नऊ हजार टनाने सक्षमपणे सुरु आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील नेतृत्वाने आपल्या भागात काय वाढत आहे, याची दूरदृष्टी असावी लागते. जसं शरद पवार सांगतात पुढील पन्नास वर्षे समोर ठेवून निर्णय घेतले पाहिजेत.

Ajit Pawar, Makrand Patil
Video: महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा कोणीही वापरु नये; अजित पवार

अजित पवार म्हणाले, खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचयात निवडणुकीत यदाकदाचित माणूस चुकीचा निवडून आला तर तिथे आर्थिक फटका बसत नाही. पण साखर कारखान्याच्या निवडणुकीत चुकीचे लोक निवडुन आली तर त्याचा मोठा आर्थिक फटका बसत असतो. जिल्हा बँकेवर जर चुकीची माणसं गेली तर त्याचा पीककर्ज बंद होते.

Ajit Pawar, Makrand Patil
कर्मवीर विद्यापीठ जूनपासून सुरू होणार... शरद पवार

पण सातारा जिल्ह्यात बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, सभापती रामराजे, शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत आहेत ते जिल्हा बँक चांगल्या पध्दतीने चालवत आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हा बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत एवढी वाईट अवस्था आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एकादिलाने काम केले पाहिजे. पण, आज महाराष्ट्रात तसे दिसत आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com