राहुल गडकर
Sangli News : गौतमी पाटील आपल्या नृत्यामुळे नियमित चर्चेत असते. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आले होते. यामुळे राज्यभरात उलटसूलट चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावरून आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) चांगलेच संतापले आहेत. गौतमी पाटीलला ज्यांनी नाचवले तो घरी जाईल, असा इशारा केसरकर यांनी दिला.
दीपक केसरकर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांना प्राथमिक शाळा बंद करण्यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले, सीएसआरच्या माध्यमातून एनजीओला फंडिंग जाते, पण एनजीओ वेगवेगळे प्रयोग करते. मुलांपर्यंत पैसे पोहाेचत नाहीत. मुलांना चांगले शिक्षण, इमारत, टॉयलेट आणि बसायला बेंचेस हवे असतात. यासाठी पैसे येणार असतील तर तुमचा विरोध का ? असा सवाल त्यांनी केला.
राज्यातील काही शाळा आम्ही बंद केल्या, काही शाळा खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिल्या, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करू, असेही केसरकर म्हणाले. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षक भरती आम्ही काढली आहे. मात्र, काही लोकांनी त्याला न्यायालयात (Court) जाऊन स्थगिती आणली. त्यामुळे भरती रखडली. त्यावर लवकर मार्ग निघेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षकांचे काम शिक्षण देणे हे आहे. त्यामुळे जे कोणी अफवा उठवतात त्यांना शोधून काढू, त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्ही एकही शाळा बंद केली नसताना तुम्हाला शाळा बंद केली म्हणून कोणी संगितले ? असा सवाल त्यांनी केला.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.