
Nagpur OBC Political News : मागण्या तोंडी मान्य करायच्या होत्या, मग बैठक कशाला घेतली, हा फार्स होता. तोंडी आश्वासनावर तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. तोंडी आश्वासनावर ओबीसी नेते कसे समाधानी झाले. मराठ्यांना ओबीसींचे प्रमाणपत्र देणार नाही, असे सरकार म्हणत असले तरी ते खरे नाही. पैसे घेऊन ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचे काम झपाट्याने सुरू असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. (OBC certificates were distributed with money to 28 lakh Marathas)
आज (ता. ३०) सकाळी विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहेत. त्यांनी ओबीसींचे प्रमाणपत्र घेतले आणि ‘व्हॅलिडिटी’ही मिळाली. पैसे घेऊन प्रमाणपत्र देण्याचं काम झपाट्यानं सुरू आहे. बाकी बैठक वगैरे, हे सगळं सोंग आहे. जळगावमध्ये कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. हे म्हणजे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे आहे.
चपराश्यापासून ते इंजिनिअरपर्यंत सर्व जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. मनुवादी लोक सरकारमध्ये असतील आणि सरकारच्या मर्जीतील माणसं भरून आरक्षण संपवलं जाईल. या जीआरची होळी करा. कारण ओबीसी, एससी, एसटी या प्रवर्गांचे हक्क संपवणारा हा जीआर आहे. जीआर बहुजनांना उद्ध्वस्त करणारा आहे.
सत्ताधाऱ्यांना गावात येऊ देऊ नका. पैसे घेऊन सरसकट प्रमाणात वाटली जात आहे. धनगर आरक्षणाचा काय तोडगा निघाला माहीत नाही. सरकार जनतेला मूर्ख बनवत आहे. त्यामुळे मी तरुणांना आवाहन करतो की, रस्त्यावर उतरा, असे वडेट्टीवार म्हणाले.
भाजपसोबत सत्तेत असणारे पक्ष हे निवडणूक आयोग खिशात घेऊन फिरत आहेत. दोन लोक जरी भाजपसोबत गेले आणि पक्ष व चिन्हाचा दावा केला तरी त्यात नवल नाही, असे अजित पवार यांच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले. प्रभू रामचंद्रांच्या नावाने हा धिंगाणा घातला जात आहे. भाजप देशातील जनतेसोबत खेळ खेळत आहे. तरुणांची डोकी भडकवण्याचे काम करत आहे. त्यांना नव्याने वाद पेटवायचा आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा हा सर्व खटाटोप सुरू असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.