Police arrest three in the Adamapur Balu Mama Temple Trust clerk kidnapping and intimidation case. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balumama Devsthan : बाळूमामा देवस्थानच्या लिपिकाचे अपहरण : कार्यध्यक्षासह, विश्वस्तांना अटक; आदमापूरच्या सरपंचांच्या सहभागाने खळबळ

Balumama Devsthan : आदमापूर बाळूमामा देवालय न्यासातील लिपिकाचे अपहरण करून इतिवृत्त बदलाची धमकी दिल्याप्रकरणी तिघांना अटक झाली असून, अन्य तिघे फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Hrishikesh Nalagune

Balumama Devsthan : महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आदमापूर येथील बाळूमामा देवालय न्यासामध्ये इतिवृत्त बदलासाठी लिपिकाचे अपहरण करून धमकावल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, पदसिद्ध विश्वस्त आणि सरपंच विजय गुरव आणि आनंदा पाटील अशी त्यांची नावे आहेत. तर अन्य तिघे जण फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

याबाबत बाळूमामा न्यासाचे लिपिक अरविंद गणेश स्मार्त यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी देवस्थानाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबूराव होडगे (रा. जरळी, ता. गडहिंग्लज) आणि पदसिद्ध विश्वस्त, सरपंच विजय विलास गुरव (रा. आदमापूर) यांनी त्यांचे अपहरण करून फये (ता. भुदरगड) येथील एका रिसॉर्टवर नेले.

तिथे जीवे मारण्याची धमकी देऊन देवस्थानाच्या जुलै २०२५ च्या बैठकीतील इतिवृत्तामध्ये बेकायदेशीर बदल करण्यास भाग पाडले. यानंतर अरविंद स्मार्त यांनी पोलिसांत धाव घेऊन सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. याआधारे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

लक्ष्मण होडगे, विजय गुरव, आनंदा मारुती पाटील नामदेव आबासाहेब पाटील, मारुती ज्ञानदेव पाटील (सर्व रा. आदमापूर) आणि विनायक कुंडलिक पाटील (रा. मुदाळ, ता. भुदरगड) या सहा जणांविरोधात भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर कार्याध्यक्ष, विश्वस्त व अन्य एकास अशा तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस सुनावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT