Sanjay Mandlik, shahu maharaj, dhirysheel mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha Election : तीन उमेदवारांचा खर्च अर्धा कोटींवर, अंतिम तपासणीत धैर्यशील माने आघाडीवर

Sachin Waghmare

Kolhapur News : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मतदान तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी पार पडल्यानंतर निवडणूक प्रशासनानं अंतिम खर्चाची तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत दोन्ही मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांचा खर्च हा अर्ध्या कोटीवर गेला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने हे निवडणूक प्रचार आणि प्रसारासाठी दैनंदिन खर्चात आघाडीवर आहेत. निवडणूक खर्च विभाग व उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या खर्चानुसार सर्वाधिक ७५ लाख २६ हजार ९३५ इतका खर्च केला आहे.

मात्र काही खर्चांवर खासदार माने (Dhairyasheel Mane) यांच्यासह खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आणि श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी असहमती दर्शवली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा खर्च 69 लाख 92 हजार 32 रुपये व कॉंग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा खर्च 59 लाख 98 हजार 961 रुपये इतका झाला आहे.

निवडणूक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून केलेल्या सर्वेनुसार आणि तपासणीनुसार हा खर्च झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, या तिन्ही उमेदवारांनी या खर्चावर आक्षेप घेत काही खर्चांबाबत असहमती दर्शवली आहे.

निवडणूक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून 12 एप्रिलपासून ते 5 मेपर्यंत उमेदवारांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला होता. खर्चाची तीन टप्प्यांत पडताळणी पूर्ण झाली. प्रशासनाने देखील आपल्या परीने खर्चाची तपासणी करून आढावा घेतला होता. शिवाय उमेदवारांनी देखील दैनंदिन खर्चाचा आढावा दिला होता.

दोन्हीकडून सादर झालेल्या खर्चाची तिसरी अंतिम पडताळणी पूर्ण झाली आहे. शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या खर्चापैकी 7 लाख 12 हजार 800, तर संजय मंडलिक यांनी 30 लाख 86 हजार 86 रुपये खर्च अमान्य केला आहे. हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांनी 48 लाख रुपये इतका खर्च अमान्य केला आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT