Kolhapur News, 8 May : लोकसभा निवडणुकीतील ( Lok Sabha Election 2024 ) तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी ( 7 मे ) पार पडले. मात्र, अनेक हौशी कार्यकर्त्यांना त्यांचा मोह नडला आहे. आपल्या नेत्याला मतदान केल्याचे व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल करून आपली प्रतिष्ठा आणि निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न काही महाभाग हौशीने केला होता. त्याबाबत 'सरकारनामा'चं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगानं तीन जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
पन्हाळा, शहापूर, हातकणंगले येथील तीन युवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर संबंधितांच्या मित्रांनी इन्स्टाग्रामवर ( Instagram ) लावलेले स्टेटस काढून टाकले. त्यामुळं हौशी महाभागांना स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इचलकरंजी येथील शहापूर या ठिकाणी मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्याची बंदी असताना मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. तसेच, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून आपल्या नेत्याप्रती असलेली प्रतिष्ठा आणि निष्ठा दाखवून दिली होती. पण, तीच प्रतिष्ठा आणि निष्ठा तरुणांना महागात पडली आहे. व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष दादासाहेब पांडुरंग देसाई यांच्या फिर्यादीनुसार एका तरुणावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी मध्ये असाच प्रकार घडला. रामचंद्र कांबळे या तरूणानं मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जात मतदान केल्याचा फोटो काढला. हे फोटो त्याने इन्स्टाग्रामवरील आपल्या अकाउंटवर स्टेटसवर ठेवला. हे निदर्शनास आल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल आसिफ कलायगार यांच्या फिर्यादीनुसार कांबळे याच्यावर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, पन्हाळावर एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता मंगळवारी दिवसभरात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि नेत्यांच्या फॅन पेजवर अशा व्हिडिओंची भाऊ गर्दी पाहायला मिळाली. खासदार संजय मंडलिक फॅन पेज, सतेज फॉर महाराष्ट्र, छत्रपती शाहू महाराज फॅन पेज येथे हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या इन्स्टाग्राम अकाउंटवर निवडणूक आयोग काय कारवाई करणार, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.