<div class="paragraphs"><p>Pratab Chandwani,Swati Chandwani &amp; sunny Chandwani</p></div>

Pratab Chandwani,Swati Chandwani & sunny Chandwani

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

एकाच कुटुंबातील तिघांना लागली ग्रामपंचायतची लॅाटरी

सरकारनामा ब्यूरो

गांधीनगर : कोल्हापुर, (Kolhapur) करवीर तालूक्यातील गांधीनगर (Gandhinagar) येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये (Grampanchayat) सदस्य म्हणून निवडून येण्याचा विक्रम झाला आहे. येथील चंदवाणी कुटुंबामध्ये प्रताब चंदवाणी, (Pratap Chandwani) त्यांची सून स्वाती चंदवाणी (Swati Chandwani) आणि मुलगा सनी चंदवाणी (Sunny Chandwani) हे आजघडीला ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपद भूषवत आहेत. यामुळे परिसरात हा कौतूकाचा विषय बनला आहे.

सिंधी समाज म्हटल की राजकारणाचा फारसा संबंध येत नाही. आपला व्यापार भला आणि आपण भले, अशा मानसिकतेत जगणारा हा समाज. मात्र, चंदवाणी कुटुंब यास अपवाद ठरले आहे. चंदवाणी कुटुंबिय व्यापार सांभाळत समाजकारण आणि राजकारणाचे कार्य करत आहेत. वळीवडे ग्रामपंचायतीमधून गांधीनगर ग्रामपंचायत वेगळी होऊन पहिली निवडणूक सन १९९२ साली झाली. त्यावेळी चंदवाणी परिवारातील जयराम चंदवाणी आणि रुक्मिणी चंदवाणी हे पहिल्या ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याचे मानकरी ठरले होते. त्यानंतर १९९७ च्या ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यापैकी कोठेना कोठे चंदवाणी कुटुंबिय जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

प्रताब चंदवाणी हे २००२ साली ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर ग्रामपंचायतीची मुदत संपण्याआधीच २००७ ला त्यांना करवीर पंचायत समितीवर ते निवडून गेले. यावेळी चंदवाणी पंचायत समितीवर असताना त्यांची पत्नी जया चंदवाणी या २००७ ला ग्रामपंचायतीवर निवडून गेल्या. त्यानंतर २०१२ साली पंचायत समितीचे आरक्षण महिला प्रवर्गाला मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीची मुदत संपण्यापूर्वी जया चंदवाणीही करवीर पंचायत समितीवर निवडून गेल्या. त्याचवर्षी प्रताब चंदवाणी हे ग्रामपंचायतीवर दुसऱ्यांदा निवडून गेले. त्यानंतर २०१७ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रताब चंदवाणी हे तिसऱ्यांदा निवडून आले. त्यावेळी रितू लालवाणी या लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशा दोन्ही पदावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे रितू लालवाणी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर प्रताब चंदवाणी यांच्या सून स्वाती चंदवाणी निवडून आल्या.प्रेम लालवाणी आणि प्रकाश उदासी या दोन सदस्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये प्रताब चंदवाणी यांचा मुलगा सनी चंदवाणी हा मोठ्या फरकाने निवडून आल्याने सध्याच्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतः प्रताब चंदवाणी, त्यांची सून स्वाती चंदवाणी आणि मुलगा सनी चंदवाणी हे तीन सदस्य कार्यरत आहेत.

काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी चंदवाणी कुटुंबियांना संधी दिल्यामुळे संपूर्ण चंदवाणी कुटुंबिय आज ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहे. यामुळे तीन सदस्य एकाच घरातील सभागृहात निवडून आल्यामुळे परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे. दरम्यान, सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आम्ही चंदवाणी कुटुंबिय नेहमी झटत असतो. आमच्या समाजसेवेची पोचपावती म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिले असल्याची प्रतिक्रिया प्रताब चंदवाणी, यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT