अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिलेच्या हाती, सतेज पाटलांनी ठोकला सलाम

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर त्यांच्या गाडीचे सारथ्य महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी केले आहे
Ajit Pawar -Trupti Mulik 

Ajit Pawar -Trupti Mulik 

Satej Patil/@Twitter 

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते, त्यांच्या गाडीचे सारथ्य करणाऱ्या पोलिस कर्मचारी तृप्ती मुळीक (trupti mulik). तृप्ती मुळीक यांचे वाहन चालविण्याचे कौशल्य पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच नाही तर तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant), आमदार सतेज पाटील (satej patil) यांनीही काैतुक केले.

सतेज पाटलांनी तृप्ती मुळीक यांचा ड्रायव्हिंग करतानाचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. नारी शक्ती! अशी उपमा देत सतेज पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन ट्विट करत तृप्ती मुळीक यांचा एक फोटो शेअऱ केला आहे. कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि मी बसलेल्या गाडीचे सारथ्य केले.

गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत. 23 डिसेंबर, 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला,"असेही त्यांनी नमुद केले आहे. त्याचबरोबर त्यांनी तृप्ती मुळीक यांना, खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar -Trupti Mulik&nbsp;</p></div>
खा. कोल्हे रोज भेटणार नाहीत! शरद पवारांनी थेट समोरच सांगून टाकलं...

रुपाली चाकणकर यांच्याकडूनही कौतुकाची थाप

तसेच, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही तृप्ती मुळीक यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ''कोल्हापुरच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे आणि आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असता तृप्ती ताईंनी अजितदादांच्या गाडीचे सारथ्य केले."

आदरणीय लोकनेते शरद पवार यांनी कायम महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आज मुळीक जी यांना पाहून साहेबांच्या निर्णयाची व्याप्ती लक्षात येते. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार साहेब यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून येते. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या भगिनीला सलाम.'' अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी तृप्ती मुळीक यांचे कौतुक केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com