Kolhapur Crime News : ग्रामपंचायतीत साडेअकरा कोटीचा भ्रष्ट कारभार केल्याचा आरोप करत संदर्भातील कामाचा स्टेटस व्हाट्सअप वर ठेवल्यानंतर संबंधित तरुणाला सरपंचाच्या भावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. सरपंचाच्या भावाकडून हॉकी स्टिकने मारहाण करत तरुणाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित तरुणांनी पाच ते सहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. संबंधित घटना हातकणंगले तालुक्यातील टोप येथे घडली आहे. नागेश पिलाजीराव पाटील (वय ३९ रा. कासारवाडी फाटा, टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नागेश यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून धनाजी बाबुराव पाटील, भगवान शंकर भोसले, विजय आनंदा भोसले, सुनिल बाबासो काटकर, सुरेश विठ्ठल भोसले, युवराज देसाई (कवठेकर) व सागर पांडुरंग पाटील (सर्व रा. भोसले खडी, टोप, ता. हातकणंगले) अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नागेश पाटील यांनी ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या एका कामाचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो आपल्या मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेवला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित आरोपींनी काल दुपारी नागेश यांना त्यांच्या राहत्या घरासमोर गाठले.
बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी धनाजी बाबुराव पाटील आणि सागर पांडुरंग पाटील यांनी हॉकी स्टिकने नागेश यांच्या उजव्या पायावर व हातावर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.