

Gram Panchayat Election : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाचे राजकारण गेल्या दीड महिन्यांपासून तापले असताना आता गाव गाड्याच्या राजकारणाचा पारा चढणार आहे. कारण मुदत संपलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येणाऱ्या 12 जूनला विशेष ग्रामसभेमध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यानंतर गोकुळची निवडणूक होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर गाव गाड्यातील पुढारी ठरवण्यासाठी जिल्ह्यात राजकारण पेटणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आठ जून रोजी आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत निघणार आहे.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होऊन त्याची आरक्षण सोडत होणार आहे. 8 जून रोजी विशेष ग्रामसभा, 12 जून रोजी आरक्षण सोडत, 17 जून रोजी प्रारूप अधिसूचनेस मान्यता, 19 जून रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध, 19 ते 25 जून रोजी हरकती व सूचना दाखल, त्यावर 23 जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय, आठ जुलै रोजी अंतिम अधिसूचनेस मान्यता, असे विविध टप्पे पार करत 10 जुलै रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे.
सध्या गोकुळ दूध संघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. गोकुळ दूध संघ हा ग्रामीण भागात विविध दूध संस्थेची जोडला आहे. त्यामुळे या राजकारणाची पडसाद ग्रामीण भागात अधिक उमटले आहेत. सध्या ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ठराव कोणाच्या बाजूने द्यायचा यासाठी या संस्थांमध्ये राजकारण उफाळण्याची शक्यता आहे. त्यात ग्रामपंचायतच्या निवडणुक प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून आरक्षण तारीख जाहीर होणार असल्याने गाव पातळीवरच्या राजकारणाला देखील उकळी येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.