सीना नदीत दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलाच्या एका बाजूची वाहतूक इतिहासात पहिल्यांदाच बंद करून दोन्ही दिशांची वाहतूक एका बाजूवर वळवण्यात आली आहे.
वडकबाळ पुलाजवळही पाणी साचल्याने सोलापूर–विजयपूर महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
करमाळ्यातील संगोबा येथे सहा नागरिकांना वाचवण्यासाठी गेलेल्या NDRFच्या बोटीला बिघाड झाल्याने जवानांसह नागरिक अडकले असून मंदिरात अडकलेल्यांना ड्रोनद्वारे अन्न व पाणी पोहोचवले जात आहे.
Solapur, 23 September : सीना नदीतून सुमारे दोन लाख क्युसेक वेगाने पाणी वाहत असून मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलाला हे पाणी लागले आहे, त्यामुळे प्रशासानाने दक्षतेचा उपाय म्हणून पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटील पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ही दोन्ही बाजूची वाहतूक एकाच पुलावरून सुरू करण्यात आली आहे. तसेच, सोलापूर-विजयपूर मार्गावरील वडकबाळ पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचल्याने या पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या (Pune-Solapur Highway) इतिहासात प्रथमच लांबोटी पुलावरून एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आली आहे. पुलावर जेसीबी, तीन रुग्णवाहिका आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, करमाळा (Karmala) तालुक्यातील संगोबा येथे पुरात अडकलेल्या सहा जणांची सुटका करण्यासाठी गेलेल्या एनडीआरएफची बोट मध्येच बंद पडली आहे, त्यामुळे एनडीआरएफचे जवान आणि सहाजण मध्येच अडकून पडले आहेत. याच ठिकाणी मंदिरात अडकून पडलेल्या नागरिकांना ड्रोनद्वारे अन्न व पाणी पुरविण्यात आले आहे.
सीना नदीतून तब्बल दोन क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. सोलापूर जिल्हा आणि मोहोळचे प्रशासन महापुराच्या स्थितीवर लक्ष ठेवून हेाते. मोहोळचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे हे या ठिकाणी उपस्थित असून मोहोळ पोलिस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला या ठिकाणी प्राचारण केले आहे. सीना नदीचे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील लांबोटी पुलाला लागले आहे.
पुलाच्या आडव्या खांबास पाणी लागल्यानंतर त्याचा दाब पर्यायाने संपूर्ण पुलावर येऊन संपूर्ण पुलास मोठा धोका पोहोचू शकतो, त्यामुळे पाणी लागल्यानंतर वाहतूक बंद ठेवणे क्रमप्राप्त ठरले आहे. पोलिस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊनच त्यानंतर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने दुपारी तीनच्या सुमारास दक्षतेचा उपाय म्हणून लांबोटी पुलावरील एका बाजूची वाहतूक बंद केली आहे. दोन्ही बाजूची वाहतूक आता एकाच पुलावरून होत आहे. प्रशासाने दक्षतेचा उपाय म्हणून पुलावर जेसीबी, रुग्णवाहिका आणि होमगार्ड तैनात केले आहेत.
दरम्यान, सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वडकबाळ येथील पुलाच्या जवळ पाणी पोचले आहे. सीना नदीतून विसर्ग वाढला तर वडकबाळच्या पुलालाही पाणी लागू शकते. या पुलालगतच्या विजयपूर महामार्गावर दोन्ही बाजूला पाणी आले आहे, त्यामुळे या पुलावरही पाणी आल्यास वाहतूक बंद होऊ शकते.
लांबोटी पुलावर वाहतूक बंद का केली गेली?
उ: पुलाच्या खांबांवर पाण्याचा दाब वाढल्यामुळे सुरक्षिततेसाठी एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली.
प्र: वडकबाळ पुलावरील परिस्थिती काय आहे?
उ: दोन्ही बाजूंना पाणी साचले असून विसर्ग वाढल्यास वाहतूक बंद होऊ शकते.
प्र: संगोबा येथे बचाव कार्यात कोणती अडचण आली?
उ: NDRFची बोट मध्येच बंद पडल्याने जवान आणि सहा नागरिक अडकून पडले.
प्र: अडकलेल्या नागरिकांना अन्नपाणी कसे पुरवले जात आहे?
उ: ड्रोनच्या मदतीने मंदिरात अडकलेल्या नागरिकांना अन्न व पाणी पोहोचवले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.