Ajit Pawar Solapur Tour : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर; जिल्ह्यातील पूरस्थिती, नुकसानीची पाहणी करणार

Solapur Flood Update News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे हे 24 सप्टेंबरला अतिवृष्टीग्रस्त सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. पूरस्थिती आणि नुकसानीची पाहणकी करून सोलापूरसाठी काही विशेष मदतीची घोषणा होते का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on
  1. उपमुख्यमंत्री अजित पवार २४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार असून त्यांच्यासोबत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेही असतील.

  2. राज्य मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी १३३९ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून पुढील पंचनाम्यानुसार आणखी मदत देण्याची शक्यता आहे.

  3. भीमा आणि सीना नदीकाठी ११० गावांत पूरस्थिती असून १८५ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

Solapur, 23 September : अतिवृष्टीमुळे जबर फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (ता. २४ सप्टेंबर) दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेही असणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री कोणती घोषणा करणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा दौरा ठरला असून सायंकाळपर्यंत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. खुद्द कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक झाली. त्या बैठकीत प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यसाठी १३३९ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे असून पंचनामे अजूनही सुरू आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित जिल्ह्यांना मदत मिळणार आहे.

Ajit Pawar
Solapur Flood : सीना नदीचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील 110 गावांत शिरले; 185 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले; माढ्यात आर्मीला बोलावले

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना अतिवृष्टीच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा ठरला आहे. त्यांच्यासोबत कृषिमंत्री भरणेही असणार आहेत. खुद्द अर्थमंत्रीच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने नुकसानग्रस्त सोलापूरच्या पदरात काय पडणार, याची उत्सुकता आहे.

भीमा आणि सीना नदीकाठी झालेल्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार आणि कृषिमंत्री भरणे हे पाहणी करण्याची शक्यता आहे. माढा, करमाळा व मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठी ते येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात 110 गावांत पूरस्थिती

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सीना कोळेगावसह तीन धरणांतून तसेच भोगावती नदीतून येत असलेल्या पाण्यामुळे सीना नदीने रौद्र रुप धारण केले आहे. सीना नदीची वहनक्षमता 50 हजार क्युसेकची असताना सध्या नदीतून सुमारे दोन लाख क्युसेक पाणी वाहत आहे, त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेरून वाहत आहे. सीना नदीचे पाणी काठावरील110 गावांत शिरले असून आतापर्यंत 185 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

Ajit Pawar
Jankar Vs Satpute : इतका नालायक, हरामखोर, बदमाश माणूस सोलापुरात सापडत नव्हता; म्हणून त्याला बीडमधून आणलं : जानकरांचा सातपुतेंवर हल्ला
  1. प्र: अजित पवार सोलापूर जिल्ह्याचा दौरा कधी करणार आहेत?
    उ: २४ सप्टेंबर रोजी.

  2. प्र: त्यांच्या सोबत कोण मंत्री असणार आहेत?
    उ: कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे.

  3. प्र: पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी किती मदत जाहीर झाली आहे?
    उ: १३३९ कोटी रुपये.

  4. प्र: सोलापूर जिल्ह्यात किती गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे?
    उ: ११० गावांत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com