पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election : ‘गावची ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले; पण...’ : मतदानानंतर शहाजीबापूंनी व्यक्त केली खंत

Vijaykumar Dudhale

उमेश महाजन

Sangola News : चिकमहूद (ता. सांगोला) गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केला. मात्र, इच्छुकांची संख्या वाढल्याने कोणालाही नाराज न करता लोकशाही पद्धतीने व निर्भयपणे तसेच खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक व्हावी, यासाठी आग्रही राहिलो, असे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. (Tried to make Chikamhood Gram Panchayat unoppose,d; But... : MLA Shahaji Patil)

चिकमहूद हे आमदार शहाजी पाटील यांचे गाव असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली त्यांच्या स्वतःच्या चिकमहूद गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. आमदार पाटील व त्यांची पत्नी रेखा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदानानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, गेल्या सुमारे तीन-साडेतीन वर्षांच्या काळात सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झालेली आहेत. या विकासकामांची जनता साक्षीदार आहे. तालुक्याबरोबरच चिकमहूद गावातही मोठ्या प्रमाणावर विकासकामे झालेली आहेत. गावात कोणतेही विकासाचे काम मागे राहिले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पॅनेलचा सहज विजय होईल.

चिकमहूद ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पाटील गटाच्या (स्व.) सुभाषनाना पाटील ग्रामविकास आघाडीकडून शोभा सुरेश कदम या सरपंच पदासाठी उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात तामजाई देवी परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या सुप्रिया सुभाष भोसले या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय आणखी एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे.

ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागांतून पंधरा सदस्य पदांच्या जागांसाठी एकूण ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. चिकमहूद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. येथील सर्वच प्रभागात मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. गावठाणातील प्रभाग चारच्या समोर सकाळी साडेसातपासून मतदारांची भली मोठी रांग लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT