Solapur Crime News Sarkarnaa
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : नंदेश्वरातील तिहेरी खून शेतीच्या बांधावरून; संशयिताने दिली कबुली

Crime News : हत्याकांडने सोलापूर जिल्ह्यात खळबळ

सरकारनामा ब्युरो

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या महिलांची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे.

दरम्यान, तिन्ही मृत महिलावर नंदेश्वर येथे शोकाकुल वातावरणात आज दुपारी दोनच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यात खळबळ उडालेल्या नंदेश्वरातील तिहेरी खून प्रकरण मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या हत्याकांडादरम्यान चार वर्षे वयाचा रुद्र नावाचा मुलगा भीतीने दरवाजा लावून घरात बसला होता. त्यामुळे सुदैवाने तो बचावला आहे.

या घटनेत नंदेश्वर येथील दीपाली बाळू माळी (२५), पारुबाई बाबाजी माळी (५५), संगीता महादेव माळी (४७) या तीन महिलांचा धारदार हत्याराने व दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्या प्रकरणी पोलीस पाटील संजय गरंडे यांनी पोलिसांनी दिली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परस्थितीची पाहणी करून परिसरातील नागरिकांकडे त्या खून कोणत्या कारणासाठी, कशामुळे, कोणासोबत पुर्वीची भांडणे होती का, आदी बाजुंनी तपास केला.

चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत समाधान महादेव लोहार (वय ३३) या संशयितास ताब्यात घेतले होते. त्यास २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्याने प्रथम चौकशीत गुन्हा केला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर घटनास्थळावरील परस्थितीजन्य पुरावे आणि नागरिकांनी दिलेली माहिती, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यान गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने तपासात सांगितले की, शेतीच्या बांधाच्या कारणावरुन व पूर्ववैमनस्यातून त्याने हातातील बेडग्याने (कुदळीने) तीन महिलांच्या डोक्यात मारुन व दगड घालून जिवे ठार मारले.

कबुलीनंतर पोलिसांनी त्यास अटक केली. हे हत्याकांड करण्यामागे इतर कोणते काही कारण आहे, का याचा तपास रणजित माने करीत आहे. हा तपास माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत आवटे, अंकुश वाघमोडे, सौरभ शेटे, पुरूषोत्तम धापटे, अविनाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, सुनील गायकवाड, पोलीस नाईक विठ्ठल विभुते, विक्रम काळे, बापू पवार, पोलीस कॉन्स्टेबल कैलास खटकाळे, राजू आवटे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT