Eknath Shinde, Ashwini Jagtap, Shrirang Barane, Mahesh Landge
Eknath Shinde, Ashwini Jagtap, Shrirang Barane, Mahesh LandgeSarkarnama

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी चिंचवडकरांना दिलेले आश्वासन आचारसंहिता भंगाच्या कचाट्यात सापडणार?

Chinchwad By election : अश्विनी जगतापांना एक लाखाच्या लीडने निवडून देण्यासाठी दाखवली लालूच

CM in Chinchwad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी आले. रात्री घेतलेल्या सभेत त्यांनी युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना एक लाखाच्या लीडने विजयी केले, तर या मतदारसंघातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असे आश्वासन दिले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आचारसंहिता भंगाच्या कचाट्यात सापडण्य़ाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यावेळी शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "अश्विनी जगताप यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करू का? एक लाखाचे लीड देणार का? चिंचवडमधील एकही काम शिल्लक ठेवणार नाही. ही जबाबदारी एकनाथ शिंदेची!"

Eknath Shinde, Ashwini Jagtap, Shrirang Barane, Mahesh Landge
Chinchwad By-Election : चिंचवडचा प्रचार मुद्यावरून गुद्यावर : ठाकरे गट शहरप्रमुख सचिन भोसलेंवर हल्ला!

शहरातील समस्या सोडवून म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासनांचा पाऊस पडला. ते म्हणाले, "शहरातील वाहतुकीसह सर्व प्रश्न सोडवू. पिंपरी-चिंचवडमधील पूर्ण शास्तीकर माफीचा जीआर लवकरच काढू, साडेबारा टक्के जमीन परताव्याचाही प्रश्न मार्गी लावू. नदीसुधार प्रकल्प राबवू. मेट्रोचा विस्तार करू, अनधिकृत बांधकामाची समस्या सोडवू, रिंगरोड सुरू करू."

Eknath Shinde, Ashwini Jagtap, Shrirang Barane, Mahesh Landge
Shinde vs Thackeray : सुप्रीम कोर्टात झालं होतं गरम, सरन्यायाधीशांनीच वातावरण केलं नरम

अश्विनीताई रेकॉर्डब्रेक मताधिक्याने निवडून येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. चिंचवडमधील राहिलेल्य़ा कामांची काळजी करू नका, तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे, असेही ते अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उद्देशून म्हणाले.

Eknath Shinde, Ashwini Jagtap, Shrirang Barane, Mahesh Landge
Nilesh Lankhe : विखे-पाटलांविरोधात नीलेश लंके लोकसभेला शड्डू ठोकणार? म्हणाले, पक्षाने...

यावेळी एमपीएसीबाबत (MPSC) शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "पुण्यात आंदोलन करणाऱ्या 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे, तीच राज्य सरकारचीही आहे. त्यांच्या मागण्याबाबत राज्य लोकसेवा आयोगाला दोनदा कळवले आहे. विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे परीक्षा होईल. त्याचं श्रेय कुणाला घ्यायचे असेल त्यांनी ते घ्यावे."

त्यानंतर त्यांनी आठ महिन्यात घेतलेल्या निर्णयांची माहिती सांगितली. त्यानंतर कमी वेळेत जास्त निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य सरकार असल्याचा दावाही शिंदेंनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com