Dhairyasheel Mohite Pati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : कोणत्याही लेव्हलवर प्रयत्न करा, आमची ऐकी तुटणार नाही;धैर्यशील मोहिते पाटलांचा विरोधकांना इशारा

Adinath Sugar Factory Election : आम्ही जिवाभावाने एकत्र आलो आहोत, त्यामुळे आमचा ऐकी तुटायचा विषय नाही. या प्रकरणात मी सर्व बाजूने जगताप यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. सगळ्या गोष्टीत आणि सगळीकडे मी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे, असेही त्यांनी ठणकावले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 08 April : लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या लोकांनी माझं काम केलं आहे, त्यांना हेतूपुरस्पर टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे. पण, माझ्यासाठी लोकसभा निवडणुकीत पळालेल्या सर्वच लोकांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे. कोणत्याही लेव्हलवर प्रयत्न करा, आमची ऐकी तुटणार नाही, असा इशारा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील (Narayan Patil ) यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यात येत आहे. त्यांच्या पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार मोहिते पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप हे उपस्थित होते.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माझे काम करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. पण, मी एवढंच सांगेन की माझ्यासाठी पळालेल्या सर्वच लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आमच्यातील ऐकी तोडण्याचा प्रयत्न चालेला आहे. पण, आमची ऐकी जिवाभावाची असून कोणत्याही पद्धतीचे प्रयत्न केले तरी ती कधीही तुटणारी नाही.

आम्ही जिवाभावाने एकत्र आलो आहोत, त्यामुळे आमचा ऐकी तुटायचा विषय नाही. या प्रकरणात मी सर्व बाजूने जगताप यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. सगळ्या गोष्टीत आणि सगळीकडे मी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे, असेही त्यांनी ठणकावले.

जयवंतराव जगताप, नारायण पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखान्याची निवडणूक लढवली जात आहे. आदिनाथ कारखाना हा सहकारी संस्था, ती लोकांनी उभी केली आहे, ती शेतकऱ्यांची संस्था राहिली पाहिजे, अशी करमाळा तालुक्यातील जनतेची विशेषतः आदिनाथ सहकारी साखर कारखाना सभासदांची तशी इच्छा आहे. त्या दृष्टीकोनातून लोकांच्या आग्रहास्तव हे पॅनेल उभं राहिलं आहे. ते संपूर्ण पॅनेल निवडून येईल, असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, करमाळा तालुक्यातील नेतेमंडळींनी आणि शेतकऱ्यांनी जगताप, पाटील आणि मोहिते पाटलांकडे कारखाना सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगून कारखान्यावर प्रशासक नेमला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला एनसीडीचे कर्ज मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो सध्या राज्य सरकारकडे आहे.

कारखान्याची निवडणूक ही पक्षीय पातळीवर होत नाही. जो तो आपापल्या पद्धतीने काम करत असतो. त्यामुळे कोण कुठल्या पॅनेलमधून उभा आहे, याला महत्व आहे. आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे आणि तो सुरू झाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT