Solapur BJP Activist : मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या सोलापुरातील भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याच्या वडिलाचा आमदार निवासमध्ये मृत्यू (Video)

Amdar Niwas-Akashwani : विशाल धोत्रे आणि त्यांचे वडील चंद्रकांत धोत्रे हे वडार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सोलापूरहून मुंबईला गेले होते. ते मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासस्थानातील 408 क्रमांकाच्या खोलीत थांबले होते.
Amdar Niwas-Akashwani
Amdar Niwas-AkashwaniSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 April : भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकदा फोन करूनही १०८ क्रमाकांची रुग्णवाहिका आमदार निवासस्थानी आली नाही, त्यामुळे शेवटी पोलिसांना फोन करावा लागला. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

चंद्रकांत धोत्रे (वय ६०, रा. सोलापूर) असे आमदार निवासात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंद्रकांत धोत्रे हे मुलगा विशाल धोत्रे यांच्यासह मुंबईला मंत्रालयात गेले होते. विशाल धोत्रे हे भाजपचे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांचे कार्यकर्ते आहेत.

वडार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचे आहे, असे सांगून विशाल धोत्रे आणि त्यांचे वडिल चंद्रकांत धोत्रे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर (Solapur) शहरातील कार्यालयातून आमदार निवासातील खोली क्रमांक ४०८ ची चावी नेली होती. जवळचे कार्यकर्ते असल्याने धोत्रे यांना आमदार निवासाची चावी देण्यात आली, पुढे काय झालं हे आम्हालाही माहिती नाही, असे आमदार देशमुख यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

विशाल धोत्रे आणि त्यांचे वडील चंद्रकांत धोत्रे हे वडार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सोलापूरहून मुंबईला गेले होते. ते मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासस्थानातील ४०८ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास चंद्रकांत धोत्रे यांना हृदयविकारच्या वेदना जाणवू लागल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या मुलाने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला वारंवार फोन केले. मात्र, रुग्णवाहिका काही आली नाही, असे त्यांचा मुलगा विशाल धोत्रे यांनी सांगितले.

Amdar Niwas-Akashwani
Karad Politic's : उमेदवारी अर्जांवरील आक्षेप ठरले टर्निंग पॅाईंट अन्‌ ‘अहंकाराच्या शड्डू’ने विरोधकांचा घात केला; संयमी बाळासाहेबांनी पुन्हा मैदान मारले

वारंवार फोन करूनही अगदी मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या आमदार निवासस्थानात रुग्वाहिका न आल्याने विशाल धोत्रे यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांची गाडी आल्यावर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिकेला फोन करण्यात वेळ गेल्याने चंद्रकांत धोत्रे यांचा मृत्यू झाला हेाता, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वेळेत रुग्णवाहिका आली असती तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता, असे विशाल धोत्रे यांनी सांगितले. आमदार निवासस्थानात रुग्णवाहिका न येण्याची चौकशी करण्यात यावी आणि आमदार निवासस्थानी एक रुग्णवाहिका कायमस्वरुपी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी धोत्रे कुटुंबीयांनी केली आहे.

Amdar Niwas-Akashwani
Babasaheb Manohare : आयुक्त बाबासाहेब मनोहरे प्रकरणात मोठी अपडेट; ‘गोळी झाडून घेण्यापूर्वी आयुक्तांना फोन आला होता’

मुंबईसारख्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी तेही मंत्रालयाशेजारी असेलल्या आमदार निवासस्थानी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसेल तर राज्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती काय असणार, असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com