Ranjeetsingh Naik Nimbalkar, Dhairysheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha Election : माढ्यात रस्सीखेच; 'हा' युवा नेता लागणार का महायुतीच्या गळाला ?

Political News : सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने प्रचाराचा माहोल चांगलाच तापला आहे. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीका करीत वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात चुरस वाढली आहे.

Sachin Waghmare

Madha News : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वत्र प्रचाराची मोठी लगबग पाहवयास मिळत आहे. सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने प्रचाराचा माहोल चांगलाच तापला आहे. सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीका करीत वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात चुरस वाढली आहे.

गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघात विविध घडामोडीमुळे चांगलाच चर्चेत आला असून दररोज त्याठिकाणी नवीन घडमोड घडत असल्याने सर्वांचे लक्ष या लक्षवेधी लढतीकडे लागले आहे. या मतदारसंघातून महविकास आघाडीने धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देत निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढवली आहे. (Madha Lok Sabha Election)

त्यामुळे येथील प्रत्येक घडामोडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच आता याठिकाणी नवीनच ट्विस्ट पाहावयास मिळत आहे. एकीकडे गेल्या 30 वर्षांचं वैर विसरुन उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी मोहिते पाटलांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर त्यांनी जानकरांनी भाषणातून अजित पवारांना (Ajit pawar) लक्ष्य केले तर देवेंद्र फडणवसींसोबतच्या (Devendra Fadanvis) भेटीची पोलखोलही सर्वांसमोर उकल केली. त्यामुळे महायुती या मतदारसंघात बॅकफुटवर गेली असल्याची चर्चा आहे.

त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन वातावरण चांगलेच तापवले आहे. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी माढ्यात सभा घेऊन अभिजीत पाटील यांना लोकसभा निवडणुकांसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सध्या माढा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार हनुमंत डोळस यांच्या मुलासोबत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे, माढ्याच्या पुढील ट्विस्टमध्ये फडणवीसांच्या गळाला राष्ट्रवादीचे संकल्प डोळस लागणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हनुमंत डोळस हे तीन वेळा माळशिरसचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे, डोळस कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग माळशिरसमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात डोळस कुटुंब भाजपसोबत आल्यास माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना होण्याची शक्यता आहे.

संकल्प डोळसच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटल्यावरही युवक नेते संकल्प डोळस हे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले आहेत. मात्र, मोहिते पाटील व उत्तम जानकर यांच्यातील युतीमुळे डोळस अस्वस्थ झाले आहेत. जानकर यांच्यामुळे विधानसभेला आपल्याला डावललं जाऊ शकेल, असा कयास डोळस कुटुंबीयांकडून लावला जात आहे. त्यामुळे, आता संकल्प डोळस काय भूमिका घेतात, याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच दिग्गजांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT