Grampanchayat Meeting sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara New : उपमुख्‍यमंत्री दोन, मग उपसरपंचही दोन हवेत...सोनापूर ग्रामपंचायतीने केला ठराव

Umesh Bambare-Patil

-विकास जाधव

Satara News : राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदे चालतात, मग आमच्या ग्रामपंचायतीत दोन उपसरपंचपदे का नकोत? याच भूमिकेतून सातारा तालुक्यातील सोनापूर ग्रामपंचायतीने आज अनोखा ठराव घेतला. त्यात गावासाठी दोन उपसरपंचपदांची मागणी करण्यात आली आहे.

सोनापूर हे नागठाण्यालगतचे महत्त्वपूर्ण गाव. आज येथील ग्रामपंचायतीची Grampanchayat मासिक सभा आयोजित करण्यात आली. त्यात गावासाठी दोन उपसरपंचपदे हवीत, असा ठराव घेण्यात आला. याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना Satara collector देण्यात आले असल्याची माहिती सरपंच सुनंदा खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोनापूर ही गट ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींतर्गत निवडुंगवाडीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य आहेत. सध्या सरपंचपद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. उपसरपंचपद हे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. रिक्त झालेल्या उपसरपंचपदावर दोघा जणांची नेमणूक व्हावी, या मागणीचा ठराव आजच्या मासिक सभेत करण्यात आला.

मात्र, असा ठराव लिहिण्यास ग्रामसेवकांनी नकार दर्शविला. त्यावर ‘जर राज्याला दोन उपमुख्यमंत्रिपदे चालत असतील, तर विकासकामांना गती मिळण्यासाठी गावालाही दोन उपसरपंचपदे असावीत,’ अशी मते उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. त्यात सरपंचांनी ‘मी महिला सरपंच आहे. सोबत दोन उपसरपंच असतील तर गावातील विकासकामांना अधिक गतीने चालना मिळेल. आम्ही आज घेतलेल्या या ठरावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे,’ असे म्हटले आहे.

सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याला दोन उपमुख्यमंत्री चालत असतील तर आमच्या गावच्या विकासासाठी दोन उपसरपंच का नकोत? गावच्या ग्रामपंचायतीलाही दोन उपसरपंच असतील तर गावच्या विकासास नक्कीच गती मिळेल.

- नंदकुमार बागल, सोनापूर, ता. सातारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT