Satara NCP News : शरद पवारांची साथ सोडून मकरंद पाटील अजितदादा गटात...

Makrand Patil वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन निर्णय जाहीर केला.
Makrand Patil, Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar
Makrand Patil, Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Satara NCP News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन निर्णय जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीत आता तीन आमदारांचा समावेश झाला असून वाई मतदारसंघातील सर्व कार्यकर्तेही त्यांच्यासोबत राहणार आहेत.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर साहेब की दादा अशी सर्वांचीच मनस्थिती झाली होती. मकरंद पाटील Makrand Patil यांचे नाव अजित पवारांसोबत Ajit Pawar असलेल्या आमदारांच्या यादीत होते. तेच त्यांचे नाव मंत्रीपदाच्या यादीतही होते. पण, शरद पवार Sharad Pawar साहेब यांच्याशी पाटील घराण्याशी असलेली भावनिक जवळीकीमुळे मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेतो, असे अजित दादांना सांगितले होते.

त्यामुळे ते काय निर्णय घेणार याची उत्सुकता जिल्ह्यात होती. याच दरम्यान, कराडला यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी खासदार शरद पवार आले होते. त्यावेळी वेळे येथूनच त्यांच्या गाडीत बसून आमदार मकरंद पाटील आले. त्यांनी सर्वांना धक्का देत चर्चेला पूर्ण विराम दिल्याचे दाखवून दिले. पण त्यानंतर वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांनीच किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी मकरंद पाटलांनी अजित पवारांसोबत जावे, असा सूर निघाला.

Makrand Patil, Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar
Rohit Pawar यांना वाटते 'ही' भीती, भाजप Ajit Pawar यांची कारकिर्द संपवून टाकेल | NCP Split | BJP

त्यामुळे मकरंद पाटील व्दिधामनस्थितीत होते. आजच ते जिल्हा बॅंकेच्या संचालकांसोबत युरोपच्या १८ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. पण, दुपारीच वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे दोनशे ते अडीचशे कार्यकर्त्यांसह मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी दादांसोबत असल्याचे जाहीर केले. यावेळी सर्वांचे स्वागत करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर अजित पवार व मकरंद पाटील यांची सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा केली. यावेळी प्रमोद शिंदे, मनिष भंडारी, अनिल सावंत, रमेश गायकवाड, शशिकांत पिसाळ, राजेंद्र राजपुरे, मोहन जाधव, उदय भोसले, मदन भोसले, किरण काळोखे, चरण गायकवाड, बाळासाहेब सोळस्कर, अमित कदम, उदय कबुले, आदींसह महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुक्यातील सुमारे अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते.

Makrand Patil, Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar
Supriya Sule On BJP : हा महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com