Solapur NCP
Solapur NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार प्रणिती शिंदेंना वाढदिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचा धक्का!

प्रमोद बोडके

सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना त्यांच्या वाढदिवशीच काँग्रेसधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सुधीर खरटमल यांनी जोरदार धक्का दिला आहे. खरटमल यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून (Congress) आज (ता. १० डिसेंबर) राष्ट्रवादीत (NCP) जाहीर प्रवेश केला आहे. लष्कर येथील बेरिया हॉलमध्ये हा प्रवेश कार्यक्रम झाला. (Two hundred Congress workers from Solapur join NCP)

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेश सोहळा झाला. या वेळी कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे, नगरसेवक तौफीक शेख, माजी महापौर नलिनी चंदेले, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, लता ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. खरटमल यांच्या सुमारे 200 समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी माजी महापौर कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सुधीर खरटमल यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जावेद शिकलकर, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, उपाध्यक्ष सोपान थोरात, माजी शिक्षण मंडळ सदस्य विठ्ठल होनमारे, सूर्यकांत शेरखाने, मौला चॉंदा, प्रभाकर सोनगीवाले, वैभव वाडे, तन्वीर मणियार, स्वप्निल गायकवाड, अन्वर बागवान, कॉंग्रेसचे सचिव द्वारकाप्रसाद तावनिया, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड, मोची समाजाचे रथोत्सव अध्यक्ष प्रवीण वाडे, कॉंग्रेसच्या महिला प्रभाग अध्यक्ष सुनंदा होटकर, युवक कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष युवराज पंतुवाले, सागर होटकर, निलेश होटकर, कृष्णा धुळराव, राजू कोरे, हिमाद शेख, रवींद्र शिंदे, अण्णा पवार, करेप्पा जंगम, सनी मेह्त्रे, गौरव पात्रे अशोक आयगोळे, वनिता गिरी, मंजू चव्हाण, प्रीती बंतल, समीरा शेख, परवीन सिंदगीकर, कांचन पवार आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे निष्ठावंतांवर अन्याय होत आहे. खरटमल यांच्यावरही कॉंग्रेसने अन्याय केला आहे. खरटमल ज्याप्रमाणे तुम्हाला कॉंग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक मिळत होती, त्यापेक्षा जास्तच सन्मानाची वागणूक तुम्हाला राष्ट्रवादीतही मिळेल. खरटमल यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचाही सन्मान केला जाईल. कॉंग्रेसमध्ये जी पदे होती, तीच पदे या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये दिली जातील, असे माजी महापौर महेश कोठे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT