<div class="paragraphs"><p>Udayanraje Bhosale with his Friends</p></div>

Udayanraje Bhosale with his Friends

 

pramod ingale, satara

पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा'वर फिदा; थिएटरमध्ये जाऊन घेतला आनंद

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा : द राइज' या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये मित्रांसमवेत जाऊन पुष्पा हा चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये जाऊन फिल्म पाहण्याची उदयनराजेंची ही पहिलीच वेळ नाही तर, याआधी देखील अनेक चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहिले आहेत.

सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 ते 400 कोटींची कमाई केली आहे. तेलुगू व्यतिरिक्त हा सिनेमा हिंदी, मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं सातारकरांना खास आकर्षण आहे. कारण हा दमदार सिनेमा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना आवडला असून त्यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये मित्रांसोबत जावून हा चित्रपट पाहिला.

उदयनराजे काहीही करू देत त्याचे औत्सुक्य सातारकरांनाच नव्हे, तर राज्यभरातील जनतेला असते. राजकीय परिणामांची भीती न बाळगता ते नेहमी बेधडक वक्तव्यं करतात. यापूर्वी त्यांच्या काही वक्तव्यांमुळे राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यात नेहमीच बोलबाला असतो.

युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कसं गं सांगू.. हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचं सर्वांनाच आकर्षण राहिलेले आहे. आता उदयनराजेंनी नुकताच आपल्या मित्रांसोबत अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट सिनेमागृहात पाहिला. थिएटरमध्ये जावून फिल्म पाहण्याची उदयनराजेंची ही पहिलीच वेळी नाहीय, तर याआधी देखील त्यांनी बरेच चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT