Udayan Raje-Shivendra Sinh Raje-Laxman Mane
Udayan Raje-Shivendra Sinh Raje-Laxman Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Laxman Mane : लक्ष्मण मानेंनी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना डिवचले; ‘...तर राजीनामा देऊन भाजपमधून बाहेर पडा’

Umesh Bambare-Patil

Satara, 22 June : लोकसभेच्या आवारातील थोर नेत्यांचे पुतळे मोदी सरकारने हटविले आहेत. ते मूळ जागेवर पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी साताऱ्यातील उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला पाहिजे. देशव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे. हे त्यांना शक्य नसेल तर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी बाहेर पडले पाहिजे. अन्यथा राजघराण्याचा वारसा सांगण्याचा अधिकार या दोन्ही राजांना राहणार नाही, अशी टीका भटक्या विमुक्त जाती, जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली.

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या घटनेच्या निषेधार्थ सातारा (Satara) जिल्हाधिकारी कार्यालय पुढे लाक्षणिक उपोषण करणार आहे, असल्याचे माने त्यांनी स्पष्ट केले आहे. लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी आज सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी दोन्ही राजांना उदयनराजे (Udayan Raje), शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Sinh Raje Bhosale) यांनी हा सल्ला दिला.

लक्ष्मण माने म्हणाले, सातारा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे. या राजधानीतील छत्रपती शिवरायांचे वारसदार राजघराण्यातील दोन्ही राजे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. थोर नेत्यांचे पुतळे हे मूळ जागेवर प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला पाहिजे

हे पुतळे मूळ स्थितीत येण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे. त्याचे नेतृत्व या दोघांनी केले पाहिजे आणि हे शक्य नसेल तर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी बाहेर पडले पाहिजे. अन्यथा राजघराण्याचा वारसा सांगण्याचा अधिकार आमच्या दोन्ही लोकप्रतिनिधींना राहणार नाही, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली.

येत्या 22 जुलै रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या पुतळ्यांच्या मुद्यावरून त्या दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा लक्ष्मण माने यांनी दिला आहे.

या आंदोलनात शाहू, फुले, आंबेडकर, गांधीवादी नागरिकांनी सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहनही भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष माने यांनी केले आहे.  या वेळी संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ जाधव, कोषाध्यक्ष हरदास जाधव  उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT