Samadhan Autade : आवताडेंचा प्रणिती शिंदेंना खोचक सवाल; तीन टर्म आमदार राहिलेल्या मतदारसंघातून तुम्हाला किती लीड मिळाला?

Pandharpur-Mangalvedha Assembly : लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर न होता विशिष्ट समाजावर गेली. तो समाज एकत्र आल्यामुळे आम्हाला अपेक्षित मतंही मिळाली नाहीत.
Samadhan Autade-Praniti shinde
Samadhan Autade-Praniti shindeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 22 June : सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून होत असलेल्या टीकेला भाजपचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तुम्ही स्वतः तीन टर्म आमदार राहिलेल्या मतदारसंघात तुम्हाला किती लीड मिळाला, असा सवाल करून त्याबाबतचे आत्मपरीक्षण करा. निकालानंतर सुरू केलेली स्टंटबाजी थांबवून कामाला लागा, असा खोचक सल्लाही आवताडेंनी खासदार शिंदेंना दिला.

मंगळवेढा तालुक्यातील विकास कामाच्या उद्‌घाटन समारंभानंतर समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना खोचक सवाल केला आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण, कांदा आणि दूर दराचा प्रश्न, तसेच संविधान बदलण्याचा खोटा अप्रपचार करण्यात आला. लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर न होता विशिष्ट समाजावर गेली. तो समाज एकत्र आल्यामुळे आम्हाला अपेक्षित मतंही मिळाली नाहीत.

विरोधी महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खोटा प्रचार करण्यात आला, त्यामुळेच आम्हाला पंढरपूर मतदारसंघात 45 हजार कमी मते मिळाली आहेत. मात्र, जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रणिती शिंदे यांचे आम्ही अभिनंदन केले.

समाधान आवताडे यांनी प्रणिती शिंदेंना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरूनही टोला लगावला आहे. तुम्ही ज्या सोलापूर शहर मध्य मतदासंघाचे प्रतिनिधीत्व तीन टर्म केले आहे, त्या मतदारसंघात तुम्हाला कमी मते का मिळाली, याचेही आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही आवताडेंनी शिंदेंना दिला.

Samadhan Autade-Praniti shinde
Solapur BJP Meeting : सोलापूर लोकसभेतील पराभवाच्या चिंतनाला दोन्ही देशमुखांसह आवताडेंची दांडी...

पंढरपूर-मंगळवेढ्यातून काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्याच्या क्रेडीटवरून समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांना टोमणा लगावला. घरात बसून कुठं लीड मिळत असतं का? अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गावभेट दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आवताडेंनी सडेतोड उत्तर दिले.

जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, विजय माने, सरोज काझी, तानाजी काकडे,राजन पाटील, जगन्नाथ रेवे, शिवाजी पटाप नंदू जाधव पप्पू काकेकर आदी कार्यक्रमाला हजर होते.

Samadhan Autade-Praniti shinde
Solapur BJP Meeting : सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत गोंधळ; निरीक्षक धनंजय महाडिकांनाच विचारला कार्यकर्त्यांनी जाब!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com