MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : उदयनराजे संतापले...म्हणाले, उपनिबंधकांचा पेन जड झालाय; असे निष्क्रिय अधिकारी पदावर बसलेत...

Udayanraje Bhosale बाजार समितीच्या निवडणूकीवरुन उदयनराजेंनी आज उपनिबंधकांसह बाजार समितीच्या सचिवावर टीकेची झोड उठवली.

Umesh Bambare-Patil

APMC Election 2023 : सातारा बाजार समितीत APMC पात्र शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र केल्यावरुन खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale संतप्त झाले आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत का मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, उपनिबंधकांचा पेन इतका जड झालाय की ते टाळाटाळ करत आहेत. असले निष्क्रिय व नकारात्मक दृष्टीकोन असलेले अधिकारी पदावर बसतात, त्यावेळी लोकांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

उदयनराजे म्हणाले, सहकारात काहीही चालते. या लोकांची टोळी सहकारात कार्यरत आहे. सातारा मार्केट कमिटीचे उदाहरण घ्या. यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. सगळे उघड असून सगळ्यांना माहिती आहे. मनवे त्याला निलंबित केलंय तरी अजून आहे. त्याच्या बंगल्यात कोण जाऊन राहिले याचा शोध घ्या. मला कशाला विचारता.

माझ्याकडून लोकांना अपेक्षा असल्या म्हणून मी काय त्यांच्या टोळीत सामील होऊ का. असे म्हणताच काही पत्रकार हसले. त्यावर उदयनराजेंनी रागावून त्यांना हसू नका मला हसलेले आवडत नाही. त्यावेळी त्यांच्या घोटाळ्यामुळे तुमच्यावर गदा येऊ नये म्हणून आम्ही आमच्या संचालकांचे राजीनामे घेतले होते. आता काय करायचे ते बघू.

अपात्र अर्जाविषयी ते म्हणाले, याची संपूर्ण जबाबदारी उपनिबंधकांची आहे. लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाला पाठीशी घालू नये. डीडीआरचा पेन इतका जड झालाय की ते टाळाटाळ करत आहेत. असले निष्क्रिय व नकारात्मक दृष्टीकोन असलेले अधिकारी पदावर बसतात, त्यावेळी लोकांनी काय अपेक्षा करायची, असा प्रश्न त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT