Pune Municipal Corporation: पुणे महापालिका प्रशासनावर सदाभाऊ खोत भडकले; कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांवर..

Sadabhau Khot Warns PMC: महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
Sadabhau Khot
Sadabhau Khotsarkarnama
Published on
Updated on

Pune News: रयत क्रांती संघटनेतर्फे पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले.

रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

शेतकऱ्यांचा शेतमाल शहरात विक्री करण्याच्या निषेध करणाऱ्या महापालिकेच्या विरोधात रयत क्रांती संघटनेने हे आंदोलन केले. आंदोलनात शेतकऱ्यांनी कांदे आणले होते.

मांजरी येथे कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्याने दंडात्मक कारवाई केल्याच्या घटना नुकतीच घडली आहे.

बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर महापालिकेच्या अधिकाऱ्याने दंडात्मक कारवाई केल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती मोर्चा संघटनेच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा शेतकऱ्यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Sadabhau Khot
Ajit Pawar News : छत्रपती संभाजीनगरच्या सभेत फडणवीसांबाबत दिलेला शब्द अजितदादांनी पाळला नाही...

या घटनेच्या निषेधार्थ रयत क्रांती मोर्चा संघटनेच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तावडी (ता. बार्शी) या गावातील शेतकरी 8 एप्रिल रोजी मांजरी भागातील ग्रामसेवक प्रशिक्षण जवळ परिसरात कांदा विक्री करीत होते.

Sadabhau Khot
Ajit Pawar News: अजितदादांच्या मनात नक्की चाललयं काय ?; दौरा रद्द, राजकीय चर्चांना उधाण

त्यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. शेतकऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. या मोर्चात शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

"25 गोणी कांद्याचे 40 हजार रुपये घेत असतील तर शेतकऱ्यांना आपल्या मुला बाळांसाठी पैसे राहिले नाहीत, 20 वर्षापूर्वी कांदा 5 रुपये दराने, त्याच दराने आजही कांदा 5 रुपये दराने विक्री होत आहे, असे असताना प्रशासन बळीराजाचा बळी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, वर्षभर काम करून ही पैसे निघत नसेल तर पुढील आंदोलन आक्रमक होईल" असा इशारा खोत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com