Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : मी सरळ नजरेने बघतो, कामेही सरळच करतो.. शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

Umesh Bambare-Patil

Shivendraraje Bhosale News : खासदार उदयनराजे Udayanraje Bhosale १८ वर्षे खासदार आहेत, या कालावधीत ते किती वेळा आंबळे गावात गेले, हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे. तसेच वाकड्या नजरेने बघणारा मी नाही. मी सरळ नजरेने बघतो आणि कामेही सरळ करतो. त्यांना वाकडे वाटत असेल तर ठिक आहे. तेथे जाऊन विकास कामांवर, तेथील समस्यांवर बोलण्याऐवजी वाकड्या नजरेने बघू नका ही डायलॉग बाजी त्यांनी केली आहे. त्याला मी फारचे महत्व देत नाही, असे प्रतिउत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी उदयनराजेंना केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आंबळे गावातील कार्यक्रमात तलवार उंचावत वाकड्या नजरेने बघू नका, असे म्हणत अप्रत्यक्षपणे आमदार शिवेंद्रराजेंना इशारा दिला होता. या इशाऱ्याला शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्या स्टाईलने प्रतिउत्तर दिले आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजे हे १५ वर्षे लोकसभेचे खासदार होते. राज्यसभेचे तीन वर्षे खासदार आहेत. त्याच्या १८ वर्षांच्या या कारकिर्दी ते कितीवेळा आंबळे गावात गेले होते. हे त्यांनी प्रमाणिकपणे सांगावे. किती वर्षातून गेला. ज्या गावाने तुम्हाला मते दिली त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न उपस्थित केला. (Latest Maharashtra News)

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तेथून इशारा दिला की वाकड्या नजरेने बघू नका. पण मी वाकड्या नजरेने बघणारा नाही. सरळ नजरेने बघतो आणि कामेही सरळच करतो. त्यांना वाकडे वाटत असेल तर ठिक आहे. तेथे जाऊन त्यांनी विकास कामांवर वक्तव्य केलेले नाही. तेथील समस्यांवर काहीही बोलेले नाहीत. पण, वाकड्या नजरेने बघू नका ही नेहमीचीच डायलॉग बाजी करुन आले आहेत. त्यांच्या या बोलण्याला मी फार महत्व देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Political Breaking News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT