Satara News : भर सभेत तलवार उंचावत उदयनराजे म्हणाले, वाकड्या नजरेने बघू नका...

Udayanraje Bhosale आंबळे येथील कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजेंचा नामाेल्लेख टाळून टीकेची झोड उठवली आहे
MP Udayanraje in Ambale Sabha
MP Udayanraje in Ambale Sabhasarkarnama

Udayanraje Bhosale News : एक चुक झाली 2012 मध्ये मी त्यांच्या प्रचाराला गेलो, त्यावेळी मनोमिलन होते. स्वार्थ साधला गेला की जसा सरडा रंग बदलतो तशी काही लोकांची खासियत असते, अशी जहरी टीका खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आमदार शिवेंद्रराजे Shivendraraje Bhosale यांच्यावर केली. तसेच भर सभेत उदयनराजेंनी तलवार उंचावून वाकड्या नजरेने बघू नका, असे म्हणत शिवेंद्रसिंहराजेना अप्रत्यक्ष इशारा दिला.

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील कलगीतूरा संपेना झाला आहे.दोघेही एकमेकांवर ताेफ डागत असून आंबळे येथील कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजेंचा नामाेल्लेख टाळून टीकेची झोड उठवली आहे.

उदयनराजे म्हणाले, काही लोकांना असं वाटतं की हा भाग हा परिसर म्हणजे माझाच आहे. पण, मला हसु येतंय, साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुध्दा पण मनात कधी असं आणलं नाही. की हे माझं ते माझं. ते नेहमी म्हणायचे समाजामुळे मी आहे. माझ्यामुळे समाज नाही.

MP Udayanraje in Ambale Sabha
Satara Political News : उदयनराजेंच्या 'आस्ते कदम'च्या बॅनरनं परळी खोऱ्यातलं राजकारण तापलं...

उदयनराजे म्हणाले, एक चुक झाली की 2012 च्या निवडणुकीत मी प्रचाराला गेलो. त्यावेळी आमचं मनोमिलन होते. स्वार्थ साधला गेला की जसा सरडा रंग बदलतो तशी काही लोकांची खासियत असते, असे म्हणत त्यां‍नी शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली. तसेच भर सभेत उदयनराजेंनी तलवार उंचावून वाकड्या नजरेने बघू नका, असे म्हणत शिवेंद्रसिंहराजेना अप्रत्यक्ष इशारा दिला.

MP Udayanraje in Ambale Sabha
Udayanraje Bhosale Meets Amit Shah: दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शाहांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com