Udayanraje Bhosale News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News: बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम उदयनराजेंनी उधळला

New Building Of Satara Bazar Samiti: त्यामुळे दोन्ही राजें मधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे

सरकारनामा ब्यूरो

Satara Politics : साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपाजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार होते. पण कार्यक्रमाच्या एक तासापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला.

आज सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होतं. पण नऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत भेट देत हे भूमिपूजन उधळून लावला आहे. या ठिकाणी असलेलं साहित्य फेकून दिले. तिथे असलेला कंटेनरही 'जेसीबी'च्या साहाय्याने पलटी करण्यात आला. त्यामुळे दोन्ही राजेमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Satara Politics)

सातारा बाजार समितीतीच्या निवडणुकीत आमदार  शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale)  यांच्या गटाची सत्ता स्थापन झाली. निवडणुकीदरम्यान शिवेंद्रराजेंना खिंडवाडी येथे नवीन बाजार समितीची इमारत उभारण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी खिंडवाडी येथे साडेपंधरा एकरवर नवीन बाजार समितीची इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार होते. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार होते. पण तितक्यात उदयनराजे भोसले स्थानिक नागरिकांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर झाले आणि आक्रमक भूमिका घेत तिथे असणाऱ्या साहित्याची मशीनच्या साहाय्याने मोडतोड सुरू केली.

साहित्याची मोडतोड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे (Udayanraje Bhosale) पोलिसांना म्हणाले , 'ही जागा माझी असून मी या जागेचा मालक आहे. मग माझे शेड मी तोडल्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा सवालही त्यांनी पोलिसांना केला. माझ्या जागेत शेड म्हणजे ते माझेच आहे. माझ्या जागेत एखाद्याने काही केले तर ती वस्तू कायद्याने माझीच होणार आहे,' असंही उदयनराजेंनी यावेळी म्हटलं.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT