Shivendraraje Vs Udayanraje Bhosale Dispute: विरोध डावलून शिवेंद्रराजेंनी नारळ फोडला; उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले

Satara Politics: साताऱ्यातील बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजनावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भिडल्याने मोठा वाद झाला.
Shivendraraje vs Udayanraje Bhosale Dispute:
Shivendraraje vs Udayanraje Bhosale Dispute: Sarkarnama
Published on
Updated on

Shivendraraje Vs Udayanraje Bhosale Dispute : खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी अडथळा आणूनही आमदार शिवेंद्रराजे भोसले व बाजार समितीच्या संचालकांनी बाजार समितीच्या नियोजित जागेवर नूतन इमारतीचे भूमिपूजन केले. शेतकरी हितासाठी या जागेवर मार्केट कमिटीचे इमारत होणारच पण विकास कामांच्या नावाखाली खासदार गट नगरसेवकांना या जागेवर प्लॉटिंग करून पैसा कमवायचा आहे. या कार्यक्रमाला विरोध करून उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

सातारा बाजार समितीच्या संभाजीनगर येथील येथील जागेवर नवीन इमारत उभारण्याच्या भूमिपूजन आज होणार होते. यासाठी आमदार गट व बाजार समितीचे संचालकांनी सकाळी या जागेवर पत्र्याचे शेड उभे केले होते. आज भूमिपूजन होणार हे लक्षात घेऊन खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी पत्र्याचे शेड उध्वस्त केले तसेच आमचे जागा आहे. कोणीही पाय ठेवायचा नाही अशी भूमिका घेतली. हे सर्व सुरू असतानाच आमदार शिवेंद्रराजे भोसले कार्यक्रमाचे ठिकाणी आले. यासोबत त्यांचे समर्थक व बाजार समिती संचालक ही उपस्थित होते.

Shivendraraje vs Udayanraje Bhosale Dispute:
Udayanraje - Shivendraraje Dispute: साताऱ्यात राजकारण तापलं; बाजार समितीच्या जागेवरून उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे भिडले

शिवेंद्रराजे नियोजित जागेकडे निघाले, त्याच वेळी खासदार उदयनराजे व त्यांचे समर्थक हे त्यांच्या पाठोपाठ गेले. दोन्ही राजे आमने-सामने उभे राहिले. एक खासदार गट आणि दुसरा आमदार गट अशी दोन गटांची एकमेंकाचया विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. अशातच दोन्ही महाराजांचा दोन्ही राजेंमध्ये वाद सुरू झाला. ही जागा बाजार समितीच्या मालकीची असून न्यायालयातून आम्हाला परवानगी मिळालेली आहे, असा दावा आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केला.

उदयनराजेंनी या जागेतील कुळांना एकत्र आणून त्यांना विरोध करण्यास भाग पाडले. त्यामुळे कुळांनी या जागेवर ठिय्या मांडला. ही जागा आमची आहे. आम्ही याच्यावर कुणालाही पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली. उदयनराजे समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. ही घोषणा सुरू असतानाच आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी भूमिपूजनाचा नारळ फोडला. यावरुन उदयनराजेंनी हे काय चाललंय, असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन्ही राजेंमधील वाद व कार्यकर्त्यातील घोषणाबाजीमुळे वातावरण चांगलेचं चिघळले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. दरम्यान बाजार समितीच्या संचालकांनी त्याच्या शेजारीच असलेल्या जागेवर नारळ फोडला.(Satara Politics)

Shivendraraje vs Udayanraje Bhosale Dispute:
Udayanraje Bhosale News: बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम उदयनराजेंनी उधळला

यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शेतकरी हितासाठी या नियोजित जागेवर मार्केट कमिटीची इमारत होणार आहे. पण विकास कामांच्या नावाखाली खासदार गटाच्या नगरसेवकांना या जागेवर प्लॉटिंग करून पैसा कमवायचा आहे. पण या कार्यक्रमाला विरोध करून उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com