Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : '...तेव्हा उदयनराजेंनी आमदार गोरेंचा फोटो बाहेर फेकून दिला!'; अनिल देसाईंचा गौप्यस्फोट

Umesh Bambare-Patil

Maan News : छत्रपती उदयनराजे भोसले यांना तिकीट देवू नये म्हणून आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या. उदयनराजेंची उमेदवारी अडचणीत आहे असं यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी भाजपला सांगितलं. हे सगळं उदयनराजेंना कळलं. म्हणून खासदार झाल्यानंतर उदयनराजे (Udayanraje Bhosale) हे भाजपच्या कार्यालयात ज्यावेळी गेले,त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तिथे लावलेला आमदार गोरेचा फोटो बाहेर फेकून दिला होता. असा गौप्यस्फोट सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला आहे. त्यांनी या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या पेकाटात काठी घातल्याशिवाय हे केकटायचं थांबणार नाही, असा घणाघातही आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केला आहे.

दहिवडी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात अनिल देसाई यांनी मंगळवारी (ता.9) मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, वरकुटे मलवडी गावाने दहा वर्षे आमदार, अकरा वर्षे सभापती, सहा जिल्हा परिषद सदस्य, तीन उपसभापती अशी वेगवेगळी पदे भूषविली आहेत. ज्यांना त्यांच्या बोराटवाडी गावातून हाकलून काढलं होतं ते आमची लायकी काढतायत.

लोकसभा निवडणुकीत ह्यांनी भाजपला सांगितले की मी ज्या उमेदवाराला सांगतोय त्याला जर उमेदवारी दिली तर त्याला निवडून आणायची जबाबदारी माझी. हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभा राहणार नाही. हे त्यांनी देवेंद्र फडणीस यांच्यासमोर सांगितले याला साक्षीदार आहेत.

त्यांनी दिलेला खासदार तर पडलायच पण त्यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे बरेचसे खासदार पडलेत.आम्ही काबाडकष्ट करून, व्यवसाय करून पैसे कमावलेत. यांच्यासारख्या चोऱ्या, लांड्यालबाड्या करून पैसे कमवले नाहीत. आमच्याकडे पैसे आहेतच अन् ते तुमची जिरवायला शंभर टक्के वापरणार आहोत. तुमची मस्ती जिरवायची ताकद या अनिल देसाईच्यात आहे. अमित शहा (Amit Shah) यांच्यासारखी दाढी वाढवून स्वतःला प्रती अमित शहा समजून अधिकाऱ्यांना हाताशी धरुन गोरगरीबांना त्रास देणं हा यांचा उद्योग आहे.

यांच्या पायाखालची वाळू सरकलीय म्हणून हे असं बोलतायत. आपला पराभव निश्चित आहे म्हणून हे असं घाणेरडं बोलतायत. खरंतर यांना अब्रू नाही पण यांनी आमदारकीच्या पदाची तरी अब्रू ठेवली पाहिजे. राजकारण व समाजकारणाला कलंक लावणारे हे लोकप्रतिनिधी आहेत. मला पुर्ण खात्री आहे ह्या बांडगुळ आमदारांचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहत नाही. मला आता त्यांना एवढंच सांगायचंय लोकसभेला ट्रेलर बघितलाय आता विधानसभेला पिक्चर दाखवणार आहोत. तुम्हाला तीन महिन्याच्यावर आमदार राहू देत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT