Devendra Fadnavis : महाराष्ट्र पेटवून पोळी भाजण्याचा 'त्यांचा' डाव; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?

Meeting On Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा आरक्षणावर विचार करून त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला मात्र विरोधकांनी बहिष्कार घातला होता.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. राज्य पेटते ठेवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची मानसिकता विरोधकांची असल्याचा हल्लबोल फडणवीसांनी केला.

फडणवीस म्हणाले, राज्यात मराठा आणि ओबीसी हे समाज आरक्षणावरून समोरासमोर आले आहेत. त्यावर शरद पवार Sharad Pawar आणि त्यांच्या पक्षाने वारंवार दोन्ही समाजात समन्वय साधण्याची सूचना केली. त्यानुसार आज झालेल्या बैठकीला शरद पवार किंवा त्यांचे प्रतिनिधी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र आजचा जो काही प्रकार घडला त्यातून महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे. आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला आहे, अशी टीकाच फडणवीसांनी केली.

बैठकीवर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर फडणवीस Devendra Fadnavis तुटूनच पडले. ते म्हणाले, राज्यात दोन समाजात तेढ निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग शोधण्यासाठी सर्व पक्षांतील नेत्यांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याची परंपरा आहे. आता मात्र विरोधकांनी या बैठकीवर जाणीवपूर्वक ऐनवेळी बहिष्कार टाकला. मराठा समाजाच्या प्रश्नांवर त्यांना बोलायला वेळ नाही. मात्र त्यांना निवडणुकीच्या बैठकीसाठी वेळ आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News: विधान परिषद निवडणुका,पावसाळी अधिवेशनाच्या गडबडीत फडणवीस अचानक राज्यपालांच्या भेटीला; 'हे' आहे मोठंं कारण

यातून त्यांनी आपली राजकीय जात कोणती हेच दाखवून दिली. दोन्ही समाजाबाबत खोटे बालायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची, अशी त्यांची मानसिकता आहे. अर्थ त्यांच्यासाठी कोणताही समाज महत्त्वाचा नाही. त्यांच्यासाठी निवडणूक आणि सत्ताच महत्त्वाची आहे, असा हल्लाबोलही फडणवीसांनी केला.

या बैठकीसाठी राज्यातील लहान-मोठे पक्ष आले होते. त्यांनी विविध सूचना मांडल्या. वंचितचे प्रकाश आंबेडकरांनीही Prakash Ambedkar सूचना केली. त्यांच्यानुसार मराठा आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांचे लेखी म्हणणे सरकारने घ्यावे. प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी. आता यावर मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतली.

दरम्यान, बैठकीत सर्व समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या सदर्भात जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत, त्यावर चर्चा करण्यात आली. आता यापुढे समाजहिताचा निर्णय घेऊ, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
Maharashtra Budget : विधानसभेसाठी सत्ताधाऱ्यांची 'मत पेरणी'; तब्बल 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com