Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : बीड हत्याप्रकरणावर उदयनराजे भोसले भडकले; म्हणाले, 'कोणी काहीही म्हणो, पण...'

Santosh Deshmukh Murder Case : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे. यावरून मोठा दबावतंत्र वाढवला जातोय.

Aslam Shanedivan

Pune News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणामुळे राज्यातील अनेक सत्ताधारी आणि विरोधक राजकीय नेते आपल्यातील मतभेद बाजुला सारत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी आवाज उठवत आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दबावतंत्र वाढवत आहेत. अशातच मुंडे यांना भगवान गडाचा पाठिंबा असल्याचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे सांगितल्याने आता याला धार्मिक स्वरूप येत आहे. यावरूनच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, 'कोणी काहीही म्हणो, पण दोषींवर कारवाई होणारच असे म्हटले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. पण मुंडे यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे म्हटले होते. तर त्यांच्या यात कोणताही हात नसताना राजीनाम्याची मागणी का? आणि कशासाठी असा सवाल केला होता.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र भगवानगडानेच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीकेची झोड उठली होती. यानंतर देशमुख कुटुंबीयांनी महंत शास्त्री यांची भेट गडावर जाऊन भेट घेतली होती.

यावेळी धनंजय देशमुख यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्यासमोर सगळी कागदपत्रे, पुरावे ठेवत बाजू मांडली होती. तर न्याय मागणाऱ्याला चुकीचे ठरवू नका असे आवाहन देखील धनंजय देशमुख यांनी महंत शास्त्री यांना केली होती. आरोपींची मानसिकता तपासूनच आश्वासन द्या असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.

आता प्रकरणावरून भाजप खासदास उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, या प्रकरणात कोणाची गय केली जाणार नाही. कोणी काहीही म्हणो, पण दोषींवर कावरवाई ही होणारच. आपल्या देशात लोकशाही असून येथे न्यायालयासमोर सर्वच समान आहेत. यामुळेच या प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, असेही खासदास उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT