Satara News, 24 News : महाराष्ट्रात महायुतीचं बहुमताचं सरकार आलं आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत राज्यभरात 132 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयी जागांमध्ये सातारा-जावळीच्या मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
या मतदारसंघातून भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांच्या विजयसाठी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) यांनी देखील चांगली ताकद लावली होती. शिवाय निवडणुकीआधीच त्यांनी शिवेंद्रराजे निवडून येतील असं भाकीत केलं होतं.
अशातच आता शिवेंद्रसिंहराजे (Shivendraraje Bhosale) आणि महायुतीच्या विजयावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील महायुतीचा विजय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवेंद्रराजेंना मंत्रिपद मिळणारच असा दावा देखील उदयनराजेंनी केला आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील टीका केली. पत्रकारांनी शरद पवारांनी या निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला मात्र निकालात त्यांचा करिष्मा दिसला नाही? असं विचारताच उदयनराजे म्हणाले, "शरद पवारांचा करिष्मा कधीच नव्हता.
आजपर्यंत त्यांनी पायात पाय घालण्याचे आणि पापापाडीची कामे केली आहेत. त्याची पोचपावती त्यांना मिळाली आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे. जशी करणी तशी भरणी" असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.
तर महायुतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणल्यामूळे त्यांना हे घवघवीत यश मिळालं आहे. तर शिवेंद्रराजे हे आमचे पुष्पा आहेत. त्यामुळे त्यांना आता मंत्रीपद मिळाल्यात जमा असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.