MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : शिवप्रताप दिन कार्यक्रमाला उदयनराजे गैरहजर राहणार?

सरकारनामा ब्यूरो

Udayanraje Bhosale : शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर होणाऱ्या सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. उदयनराजे यांनी प्रतापगडावरील सोहळ्यासाठी उपस्थित राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र उदयनराजेंकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

आज होणाऱ्या प्रतापगडावरील सोहळ्यासाठी उदयनराजे यांनी उपस्थिती लावणे, हे स्वत: मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत . ज्या प्रतापगडावर हा सोहळा होत आहे, त्यावर उदयनराजे यांचे नियंत्रण आहे. म्हणून त्यांची उपस्थिती ही राज्यसरकारसाठी महत्त्वपूर्ण आहे. ते सहभागी व्हावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र उदयनराजेंनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. उदयनराजे हे साताऱ्यात आहेत, मात्र ते कार्यक्रमासाठी जातात का? याबाबत साशंकता आहे.

आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री गडावर पोहचतील. त्यानंतर हा कार्यक्रम पार पडेल. यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. भवानीमातेचं पूजनासहइतर अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत, मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे उदयनराजे हे शिंदे - फडणवीस सरकारवर नाराज आहेत. राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उदयनराजेंनी केली होती.

राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाई न झाल्याने, उदयनराजेंची नाराजी आहे. त्यामुळेच आजच्या शिवप्रताप दिनाला ते उपस्थित राहणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. निषेधाचा त्यांनी हा मार्ग स्विकारल्याची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT