Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असेल तर मी मेलो असतो ते परवडलं, असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले भावूक झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते चांगलेच आक्रमक देखील झाल्याचे पाहायला मिळाले.
उदयनराजे म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल करण्यात येणारे विकृतीकरण थांबले पाहिजे, अन्यथा येणारी पिढी आपल्याला काय म्हणेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सध्या मोडतोड होतेय, आपण फक्त त्याकडे पाहत बसलोय, त्यामुळे याकडे जनतेने गंभीरतेने पाहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीकडे चुकीचा आणि खोटा जातोय. महापुरुषांचा असा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे'', अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
''छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं वक्तव्य केल्यावर देखील कारवाई होत नसेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'', असा इशारा यावेळी उदयनराजेंनी दिला. ''सध्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गलिच्छ वातावरण तयार केलं जातंय. पण शिवाजी महाराजांचा असा आपमान होत असेल तर मी मेलो असतो ते परवडलं असतं'', असा संताप व्यक्त करत उदयनराजे पत्रकार परिषदेत भावूक झाले.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत सविस्तर भूमिका मांडली. यावेळी ते आक्रमक झाले होते. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदी ( Prime Minister Modi), राष्ट्रपती मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.