Udayanraje Bhosale and Shivendra Singh Raje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : उदयनराजेंनी शिवेंद्रसिंह राजेंना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले 'त्यांनी...'

Umesh Bambare-Patil

Satara News : सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी त्यांच्या सुरुची या निवासस्थानी जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी दोघांनी एकमेकांचे तोंड भरून कौतुक केले.

उदयनराजेंनी(Udayanraje Bhosale) या वेळी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला, तर शिवेंद्रसिंहराजेंनी या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना सातारा जावळीतून मताधिक्य देण्याचीही ग्वाही दिली. यावर उदयनराजेंनी त्यांना तुम्ही फार मोठं व्हावं. जिल्ह्याचे महाराष्टाचे बघावं. त्यांच्यासाठी जे करावे लागेल ते मी करेन, अशा शब्दांत शुभेच्छा देऊन शिवेंद्रसिंहराजेंना आशीर्वाद दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(Shivendra Raje Bhosale) यांचा आज वाढदिवस असून, त्यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी सातारा, जावळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी मध्यरात्री साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. आज दुपारी खासदार उदयनराजे भोसले हे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या सुरुची या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी खासदार उदयनराजे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे यांनी फार मोठं व्हावं. long life, lots of love, lots of success... त्यांच्यासाठी जे काय करायचे ते मी करेन. मेहरबानी करून हे राजकारण नाही. आयुष्यात आजपर्यंत राजकारण करत आलो आहे. पण, आज जे चाललंय ही काळाची गरज आहे. आमचे लहानपणाचे फोटो बघितले तर मी यांच्या पायी मी मार खाल्लाय. माझ्याकडून काही अनवधनाने चुकलं असेल तर मी माफी मागणार नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो. जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे त्यांनी बघावे. कुठं ना कुठं तरी आयुष्यात प्रत्येकाने थांबायला हवं. ते आता ५० वर्षांचे झाले आहेत. पण, माझ्या वयाचे काढू नका, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.

यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, दादा आले व त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की राजकीय व घरातील विषय वेगळे असतात. राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ ते आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे मला आज दहा हत्तींचे बळ मिळाल्यासारखे वाटतं. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. दिल्लीवरूनही निर्णय जाहीर व्हावा, म्हणजे कामाला लागता येईल. मी फार छोटा आहे. सातारा-जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही. आता त्यांनी दिल्लीतून सगळे शिक्कामोर्तब करून टाकावे, म्हणजे प्रचार करायला मोकळे आहोत. यावर उदयनराजे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे जे काही बोलले ते त्यांच्या हृदयातून आलेले आहे. ते आजच्या पुरते नाही तर ते माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत असेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT