MP Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : 'आता हा बच्चा माेठा झालाय, हे त्यांना समजलंय'; उदयनराजेंचं विधान!

Umesh Bambare-Patil

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी महाबळेश्वर परिसरात संपर्क दौरा करून गाठीभेटी घेतल्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना विविध प्रश्नांना मिश्किलपणे उत्तरे दिली.

महाविकास आघाडीकडून तुमच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत विचारले असता उदयनराजे(Udayanraje Bhosale) म्हणाले, मी आजपर्यंत कधीही राजकारण केलं नाही, समाजकारणच केलं. कधी कुणाला दुखावलं नाही. त्यामुळे निवडणुकीत लोकशाहीतील राजे सर्व काही ठरवतील, असे सांगून टाकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कमळ चिन्ह आणि उदयनराजे...

तुमचे चिन्ह जाहीर झालेलं नसतानाही तुम्ही कमळ चिन्ह घेऊन जिल्हा पिंजून काढत आहात. दिल्लीवरून तुम्हाला काही संकेत आले आहेत का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, 'मला इतक्यात वरती बोलवू नका. मी इतक्यात जातही नाही. कारण लोकांची ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मी सेवा करत राहणार आहे.'

कॉलर काढून घेऊ शकत नाहीत....-

कॉलर उडवली वडीलधारी आहेत. घाटाईच्या मंदिराला भेट देण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी प्रत्येकाची एक स्टाइल असते. तुमची काय स्टाइल असेल, असे विचारले होते. त्यावर मलाही वाटले काय तरी केलं पाहिजे. मी माझी कॉलर उडवली आणि हीच माझी स्टाइल आहे, असे सांगितले. यावर अनेकदा टीकाही झाली ‘कॉलर वाला’ आहे म्हणून. पण, माझ्यावर लोकांचा जीव आहे, आता कोणीही माझी कॉलर काढून घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं.

गर्मीच्या दिवसांत हाच ड्रेस योग्य...-

सध्या तुम्ही ‘लुक’ बदललाय यावर उदयनराजे भोसले म्हणाले, मी कुर्ता पायजमा घातला. पण, लोकांना वाटायचे हा मोठ्या बापाचा पोरगा दिसतोय. त्यामुळे चांगली कपडे घालणे योग्य नाही. मी लंगोटही घालू शकत नाही. अंग तर झाकलं पाहिजे. गर्मीच्या दिवसात हाच ड्रेस चांगला आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही अनेक गाड्या चालविल्या आहेत. आता राजकारणात कोणत्या गाड्या धावतायत, या प्रश्नावर ते म्हणाले, मला माझी गाडी माहिती आहे. इतर कोणाची गाडी धावणार हे मला माहिती नाही. प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे, त्यांच्या गाड्या फिराव्यात, असे मला वाटतं.

सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध.... -

शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील(Srinivas Patil), पृथ्वीराज चव्हाणपैकी कोणाशी मैत्रीचे संबंध आहेत, या प्रश्नावर उदयनराजेंनी दिलखुलास उत्तर दिले. ते म्हणाले, माझे वैचारिक मतभेद असतील, पण सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांचे विचार त्यांच्याजवळ अन् माझे विचार माझ्याजवळ. चर्चेतून मार्ग काढू शकतो. कोणाला कमी लेखायचा प्रश्नच नाही. ही सगळी मित्रमंडळी असून, श्रीनिवास पाटील हे तर माझ्या वडिलांचे खास मित्र आहेत. याबाबत दिल्लीत त्यांनी मला सांगितलं होतं की, मी तुमच्या बारशाला उपस्थित होतो. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी निश्चित आहे.

अनेकदा पावसामुळे सगळं झालं, असे तुम्ही सर्वजण म्हणता. पण, सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे देवाची कृपादृष्टी व्हावी आणि पाऊस पडावा, तरच लोकांची कृपादृष्टी होईल, असे त्यांनी नमूद केलं.

उदयनराजेंनी निवडणूक बिनविराेध करण्याचा डाव आखला आहे का? असे विचारले असता त्यांनी सगळ्यांचे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे तेदेखील विचार करताहेत. आपण म्हणताे ना ‘बच्चा समझ के छाेड दिया.’ आता हा बच्चा माेठा झाला आहे, हे त्यांना समजलंय. मला माझं कार्य केले पाहिजे. त्यांना त्यांचे कार्य केले पाहिजे. काही असलं तरी या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत हाेईल, असेही उदयनराजेंनी नमूद केले.

(Ediyted by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT