MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : ... म्हणून उदयनराजेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?

Umesh Bambare-Patil

Satara Lok Sabha Constituency Election Result : सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांना केंद्रात मोठी जबाबदारी  देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार विजयी झाला आहे. त्यामुळे या भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी खासदार उदयनराजेंना महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

साताऱ्यात भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व राजे समर्थकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात कमळ फुलले आहे. उदयनराजेंच्या माध्यमातून भाजपला साताऱ्यात पहिला खासदार मिळाला आहे आणि आता केंद्रात नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे.

येत्या 9 जुनचा मुहूर्तही ठरला आहे. त्यामुळे यावेळेस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना ताकत देण्यासाठी त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच उदयनराजेंच्या माध्यमातून भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात ताकत निर्माण करून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यापूर्वी राज्यात भाजपची सत्ता असताना दिवंगत गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळाले होते.

त्यानंतर राज्यसभेवर घेतल्यानंतर भाजपकडून उदयनराजेंना(Udayanraje Bhosale) मंत्रिपद मिळण्याचे संकेत होते. पण काही कारणांनी ते मिळाले नाही. यावेळेस सर्वांचे अंदाज फोल ठरवत उदयनराजे 32 हजारांवर मतांनी सातारा लोकसभेतून निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळी मोदी यांच्या मंत्रिमंडळात खासदार उदयनराजे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

तसे झाल्यास भाजपकडून मंत्रिपद मिळवण्याची त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. सातारा, कोल्हापूर व सांगलीत भाजपची ताकत वाढविण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरच असणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT