Narendra Modi, Udayanaraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : खासदार उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदींची भेट; करणार ही मागणी...

तत्कालीन समाजव्यवस्थेचे चटके सोसलेल्या डॉ. बाबासाहेबांनी Dr. Babasaheb Ambedkar, छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांचा सर्वधर्मसमभाव आणि समतेचा pantheism and equality विचार भारतीय राज्यघटनेने Constitution of India देशवासीयांना दिले आहेत.

सरकारनांमा ब्यूरो

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये सात नोव्‍हेंबर १९०० मध्‍ये प्रवेश घेतला होता. हा दिवस देशभरात साजरा होण्यासाठी राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून घोषित होण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्‍याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात उदयनराजेंनी म्‍हटले की, डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रामधून युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेचे चटके सोसलेल्या डॉ. बाबासाहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वधर्मसमभाव आणि समतेचा विचार भारतीय राज्यघटनेने देशवासीयांना दिले आहेत.

सात नोव्‍हेंबर १९०० रोजी भीमराव आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तो त्‍यांच्‍या शालेय जीवनाचा पहिला दिवस होता. हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून राज्यभर साजरा होत आहे.

यासाठी आमच्या गटाचे सातारा पंचायत समितीचे तत्कालीन सदस्य प्रवीण धस्के यांनीच ठराव मांडत शासनाकडे पाठपुरावा केला होता. यानुसार तत्‍कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालाप्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला होता. हा दिवस राष्‍ट्रीय विद्यार्थी दिन म्‍हणून देशभर साजरा होण्‍यासाठी मी पंतप्रधानांची भेट घेत मागणी करणार असल्‍याचेही त्‍यांनी पत्रकात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT