..म्हणून आम्ही संभाजीराजे अन्‌ उदयनराजे यांचे आभार मानले : ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकांनी मांडली भूमिका!

Har Har Mahadev : राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी चित्रपटाचे शो थांबवण्यात आले होते.
Abhijit Deshpande
Abhijit DeshpandeSarkarnama

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आलेली आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आणि शिवकाळावर बरेच चित्रपट निर्माण होत आहेत. मात्र असे चित्रपट तयार करताना इतिहासाची मोडतोड होत आसल्याचा आरोप होत आहे. नुकतंच संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांनी यापुढे असे चित्रपट बनत राहिले तर माझ्याशी गाठ आसल्याचा, इशारा दिला होता. यानंतर राष्ट्रवादीकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी चित्रपटाचे शो थांबवण्यात आले होते. आता यावर चित्रपट दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

अभिजित देशपांडे म्हणाले, खरंतर आमचा जी काही भूमिका आहे, ती आम्ही सेन्सॉर बोर्डसमोर मांडली आहे. आम्हाला सेन्सॉर बोर्डाने काही प्रश्न विचारले होते, त्यावेळी आम्ही संबंधित इतिहासाचे दाखले त्या त्या वेळी सादर केलेले आहेत. या सर्व प्रकियेनंतरच आम्हाला सेन्सॉर बोर्डाने या बाबतचं प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आम्ही फार काही बोलणार नाही. ज्या ज्या मुद्द्यावर आक्षेप घेतला जात आहे, त्याच स्पष्टीकरण आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे दिलेलं आहे, असे देशपांडे म्हणाले.

Abhijit Deshpande
हर हर महादेव चित्रपटावर न बोलण्याचा राज ठाकरेंचा मनसे प्रवक्त्यांना आदेश

सगळ्या आक्षेपांना आम्ही उत्तर देत बसणार नाही. पण याबाबतचं एक अधिकृत निवेदन आज रिलीज केले जाईल. त्यामुळे आता फार काही बोलणार नाही. सगळ्या आक्षेपांना आम्ही उत्तर देत बसणार नाही. केळुस्कर खूप मोठे इतिहासकार होऊन गेलेत. ते मोठे इतिहासकार आहेत त्यांनी 1905 ला एक पुस्तक लिहिले होत. तेच आम्ही सिनेमात दाखवलं आहे.

Abhijit Deshpande
अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!

छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जी शिकवण दिली, त्यांचं आपण खरच पालन करतोय का असा प्रश्न आता पडू लागलाय. संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले हे महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी इतिहासाच्या अनुषंगाने बऱ्याच चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्यांचे आभार मानले, हे आम्ही कर्तव्य समजलं, असही देशपांडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com